Next
‘टाटा टेली’तर्फे पुण्यात स्मार्टऑफिस सोल्यूशन
प्रेस रिलीज
Saturday, June 23, 2018 | 05:12 PM
15 0 0
Share this story

उपस्थितांना मार्गदर्शन करताना ‘टीटीबीएस’चे पश्चिम विभागाचे एसएमई ऑपरेशन्स प्रमुख मन्नू सिंगपुणे : टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबीएस) या भारतातील व्यवसायांना कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन सोल्युशन्स देणाऱ्या अग्रगण्य कंपनीने पुण्यातील छोट्या व मध्यम उद्योगांसाठी स्मार्टऑफिस सोल्यूशन आणले आहे. स्मार्टऑफिस हे व्यवसायांच्या माहिती व संवाद तंत्रज्ञानविषयक (आयसीटी) सर्व गरजांची पूर्तता करणारे एक कल्पक सिंगल बॉक्स सोल्यूशन आहे.

व्हॉइस, डेटा, स्टोअरेज आणि अॅप्लिकेशन्स हे सर्व एकत्रित देणारे हे एक शक्तिशाली सोल्यूशन आहे. स्मार्ट ऑफिस परवडण्याजोगे, भरवशाचे आणि बसवण्यास सोपे असून, नवीन कार्यालय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योगांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. ‘टीटीबीएस’च्या पुण्यातील प्रमुख कार्यक्रम डू बिग फोरमदरम्यान या उत्पादनाचे लाँचिंग करण्यात आले. तेथे छोट्या व मध्यम उद्योगक्षेत्रांतील २५० प्रतिनिधींना हे नवीन युगाचे उपकरण-सोल्यूशन पुण्यात प्रथमच बघण्याची संधी मिळाली.

छोटे व मध्यम उद्योग तसेच स्टार्ट-अप्ससाठी अनेकविध तंत्रज्ञाने व उपकरणांचे व्यवस्थापन करणे, कॅपेक्स आणि ऑपेक्स (भांडवली खर्च) करणे आणि अनेक व्हेंडर्स व भागीदारांना हाताळणे हे मोठे आव्हान आहे. ‘टीटीबीएस’चे स्मार्टऑफिस या सर्व समस्यांवर उत्तर असून, याद्वारे एक दमदार, भविष्यकाळासाठी सज्ज तसेच किफायतशीर आयसीटी सोल्यूशन पुरवले जाते.

आयपी-पीबीएक्स, डेटा रूटर, वाय-फाय रूटर, फायरवॉल, डीएचसीपी सर्व्हर आदी एका उद्योगाला दूरसंचार पायाभूत सुविधा स्थापन करण्यासाठी आवश्यक अनेकविध उपकरणांची कार्यात्मकता हे सोल्यूशन एका बॉक्सद्वारे पुरवते. बेसिक रेट इंटरफेसेस, प्रायमरी रेट इंटरफेसेस, स्थानिक पीएसटीएन गेटवेज आदी व्हॉइस आणि डेटासाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा स्थापन करण्याची गरजच या सोल्यूशनने संपवली असून, यामुळे माहिती-संवाद तंत्रज्ञानावर होणारा खर्च लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो.

या उत्पादनाच्या लाँचिंगच्या वेळी ‘टीटीबीएस’चे पश्चिम विभागाचे एसएमई ऑपरेशन्स प्रमुख मन्नू सिंग म्हणाले, ‘छोट्या व मध्यम उद्योगांना कमी खर्चाची, तसेच कल्पक आयसीटी सोल्यूशन्स पुरवण्यासाठी ‘टीटीबीएस’ कायमच प्रयत्नशील राहिली आहे. पुण्यातील छोट्या व मध्यम उद्योगांना स्मार्टऑफिस सोल्यूशन हा दूरसंचार सेवांसाठी आवश्यक ऑल-इन-वन बॉक्स उपलब्ध करून देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. व्यवसायांना, विशेषत: स्टार्ट-अप्सना, दूरसंचार पायाभूत सुविधांवर पुन्हा-पुन्हा भांडवली खर्च करावा लागू नये याची काळजी घेऊन आम्ही हा बॉक्स तयार केला आहे.’   

‘टीटीबीएस’ दरवर्षी ‘डू इट बिग फोरम्स’चे आयोजन करते. हा एक अनेक शहरांमध्ये घेतला जाणारा ग्राहक संवाद तसेच शिक्षण उपक्रम असून, यामध्ये सर्व उद्योगक्षेत्रांतील दिग्गजांना निमंत्रित केले जाते. लक्ष्यवेधी उत्पादन व सेवांच्या निर्मितीसाठी, ग्राहकांसोबत वेगाने जोडून घेण्यासाठी आणि पैशाचा पुरेपूर वापर करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होत आहे, यावर या दिग्गजांमध्ये चर्चा घडवून आणली जाते. हे ग्राहकांशी संवाद साधण्याचे एक व्यासपीठ असून, याद्वारे छोट्या व मध्यम उद्योगांपुढील आव्हाने समजून घेण्याचा व त्यांना योग्य ती डिजिटल सोल्यूशन्स पुरवण्याचा प्रयत्न ‘टीटीबीएस’ सातत्याने करत असते.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link