Next
‘शाओमी’तर्फे ‘रेडमी ५’ दाखल
प्रेस रिलीज
Saturday, March 24, 2018 | 05:08 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘शाओमी’ या भारतातील स्मार्टफोन ब्रँडने त्यांच्या ‘रेडमी ५’च्या सर्वस्वी नव्या रूपाची घोषणा करत प्रत्येकाला नवीन अनुभव देऊ करण्याच्या ध्येयाप्रती मोठे पाऊल पुढे टाकले आहे. परवडण्याजोगे मूल्य असलेल्या या स्मार्टफोनने प्रथमच ‘रेडमी ५’प्रमाणे सुलभ असे पूर्ण स्क्रीन इनोव्हेशन फोनमध्ये दिले आहे. यामुळे नवीनतम स्मार्टफोन टेक्नोलॉजी आकर्षक किंमतीत उपलब्ध करून देण्याची ‘शाओमी’ची बांधिलकी पक्की झाली आहे.

२०१६मध्ये ‘एमआयएक्स’सोबत मुख्य प्रवाहात फुल स्क्रीन डिस्प्ले कॉन्सेप्ट घेऊन येणारी ‘शाओमी’ ही पहिली टेक्नोलॉजी कंपनी ठरली होती. ‘रेडमी ५’ नवीन मोबाईल युजर्सना अगदी तसाच अनुभव देतो. कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टर तसाच कायम ठेवत वाढीव, उपयुक्त स्क्रीन एरिया वापरण्याची संधी देतो. रेडमी स्मार्टफोन्स जगभरातील युजर्सना आकर्षक किंमतीत सर्वोत्तम तंत्रज्ञान नेहमीच पुरवत आले आहे. १८:९ डिस्प्ले व्यतिरिक्त ‘रेडमी ५’ने या श्रेणीत क्वालकोम स्नपड्रगन १४ एनएम एट कोअर प्रोसेसर  मागील कॅमेरा व पुढील सेल्फी लाईटसाठी लार्ज पिक्सल (१.२५μm) सेन्सरसारखे गुणधर्म देऊ केले आहेत. ही सगळी वैशिष्ट्ये खूप सूक्ष्मरीत्या बांधली गेली आहेत.

५.७ इंच १८:९ डिस्प्ले जो जवळजवळ समोरचा संपूर्ण भाग व्यापतो. जुन्या १६:९ डिस्प्लेच्या तुलनेत ‘रेडमी ५’ अधिक मोठा व्ह्यूइंग एरिया देतो. युजर्स बातमी वाचत असतील, स्प्रेडशीट एडीट करत असतील किंवा मग त्यांच्या स्मार्टफोनवर गेम खेळत असतील, हा त्यांच्या युजर्सना एक वेगळा अनुभव देतो. याव्यतिरिक्त ‘रेडमी ५’ला गोलाकार डिस्प्ले कॉर्नरची स्क्रीन आहे आणि बांधेसूदपणा, आकर्षकपणा हे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून तो बनवला गेला आहे.

चारही बाजूने वक्र डिजाईन असल्यामुळे हा फोन हाताळणे अगदी सोयीस्कर होते. ‘रेडमी ५’ला मागील बाजूस लार्ज १.२५ पिक्सल सेन्सर कॅमेरा आहे. काही प्रमुख डिव्हाइसेसमागे जो हमखास आढळतो. जितका जास्त पिक्सल असेल तितका अधिक प्रकाश सेन्सर खेचून घेऊ शकते. पुरेशा प्रमाणात प्रकाश नसलेल्या परिस्थितीही उत्तम इमेज क्वालिटी देते.

‘रेडमी ५’ची फ्रंट सेल्फी लाईट युजर्सला कमी प्रकाशातही सुंदर सेल्फी काढण्याचा अनुभव देते. नेहमी चालू मोडसह व्हिडिओ शुटींग करत असतानाही नेमका तोच परिणाम देते. ‘शाओमी’च्या ब्युटीफाय ३.० च्या सहयोगाने, ‘रेडमी ५’ अतिशय कौतुकास्पद व सुंदर असे सेल्फीज देतो.

रेडमी मालिकेतील बॅटरी लाईफ हे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ‘रेडमी ५’ने तीन हजार ३०० एमएएच बॅटरीची निर्मिती करून ही परंपरा जपली आहे. ‘एमआययुआय ९’मधील सुधारणांच्या जोडीने, पॉवर-दक्ष १४एनएम फिनफेट क्वालकोम स्नपड्रगन, चिपसेट, ‘रेडमी ५’ला सहजपणे दिवसभर दीर्घकाळ टिकणारी बॅटरी लाईफ प्रदान करते.

प्रीमियम मेटल बॉडीने बनलेला, अवघ्या ७.७ मिमी जाडीचा ‘रेडमी ५’ आत्तापर्यंतचा सर्वात स्लीम रेडमी स्मार्टफोन आहे. फोनच्या बॅटरी लाईफमध्ये कोणतीही तडजोड न करता हे साध्य केले आहे. युजर्सने वाखाणावी अशी ही गोष्ट आहे. २० मार्चपासून सुरू झालेल्या वीकली सेल्समध्ये ‘रेडमी ५’ उपलब्ध होईल. Mi.com, अॅमेझॉन आणि एमआय होम स्टोअरमध्ये दोन जीबी, १६ जीबी, तीन जीबी, ३२ जीबी व चार जीबी, ६४ जीबी अनुक्रमे सात हजार ९९९ रुपये, आठ हजार ९९९ रुपये आणि १० हजार ९९९ रुपयांना मिळेल. येत्या आठवड्यांमध्ये ‘रेडमी ५’ सर्व ऑफलाइन भागीदारांकरिता देखील उपलब्ध केले जातील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link