Next
‘त्यांनी’ बांधल्या एसटी कर्मचाऱ्यांना राख्या
BOI
Monday, August 27, 2018 | 03:15 PM
15 0 0
Share this article:



नंदुरबार :
राज्याच्या गावागावात सेवा पुरविणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नंदुरबारमध्ये अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘संस्कार संचित’तर्फे २६ ऑगस्ट २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चिमुकल्यांनी एसटी बसचे वाहक व चालकांना राख्या बांधल्या. या वेळी एसटीचे कर्मचारी व चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त दिसत होते.

संस्कार वर्गातील मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारात रक्षाबंधनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. एसटी आगारात कार्यरत असलेले वाहक, चालक, तंत्रज्ञ या सर्वांना ओवाळून राखी बांधण्यात आली. मुलांनी या वेळी आपल्या दैनंदिन पाठांतराचे सादरीकरण केले. यामध्ये विविध श्लोक, स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील कविता, तसेच देशभक्तिपर गीतांचा समावेश होता. 

शशिकांत घासकडबी यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. या वेळी मुले आईसह आली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एसटी महामंडळाचे अधिकारी, आगार व्यवस्थापक नीलेश गावित, श्री. गोंधळी, श्री. जगताप आदींनी सहकार्य केले. वर्षा घासकडबी, सुवर्णा नंदनपवार, गीता आवटे, पल्लवी शास्त्री, शर्वरी शास्त्री, आदिती अग्निहोत्री आदी या वेळी उपस्थित होत्या.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search