Next
‘विरासत’मध्ये चार गुरू- शिष्य जोड्या एका मंचावर
प्रेस रिलीज
Friday, February 09 | 02:37 PM
15 0 0
Share this story

पुणे :  ‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये गुरू- शिष्य परंपरा दीर्घकालीन आहे. सांगीतिक घराण्यांसह एकाच घरातील, रक्ताच्या नात्यातील गुरू आणि शिष्य यांचे या सांगीतिक परंपरेत एक वेगळे स्थान आहे. अशाच रक्ताच्या नात्यातील गुरू – शिष्यांच्या सुप्रसिद्ध चार जोड्यांच्या सादरीकरणातून पारंपरिकतेबरोबरच आधुनिक संगीताची अविस्मरणीय, अदभूत अशी ‘विरासत’ येत्या १५ फेब्रुवारीला पुणेकरांना अनुभवता येणार आहे’, अशी माहिती प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘विरासतमध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध घट्टम वादक पद्मभूषण विक्कू विनायकराम व त्यांचे सुपुत्र सेल्वा गणेश आणि ज्येष्ठ वादक तैफिक कुरेशी – प्रसिद्ध तबलावादक ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसैन हे सुप्रसिद्ध बंधू समाविष्ट होणार आहेत, शिवाय प्रसिद्ध वादक लुई बॅंक्स - जिनो बॅंक्स ही पिता – पुत्रांची जोडी,  कर्नाटकचे प्रसिद्ध व्हायोलीन वादक गणेश – कुमरेश हे दोघे भाऊ असले तरी त्यांच्यात गुरू– शिष्य नाते आहे, अशा कलावंतांचा समावेश आहे.  यातील गुरू – शिष्यांचे एकत्रित सादरीकरण अनेकदा बघायला मिळते मात्र चार गुरू – शिष्य, बंधू, पिता – पुत्र अशा जोड्यांचे एकाच वेळी सादरीकरण हे ‘विरासत’चे खास वैशिष्ट्य असून असा दुर्मिळ योग पहिल्यांदाच घडणार आहे’.

‘मिराज क्रिएशन्स आयोजित ही अनोखी संगीत मैफल येत्या १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वा. महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे. देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात होत असलेली ‘विरासत’ ही फक्त सांगीतिक मैफल नाही तर यातून आपली पुणेरी परंपरा उलगडणार आहे’, असेही राहुल रानडे यांनी सांगितले.

‘मुख्य रंगमंचाला शनिवारवाड्याचा लुक असेल तर मुख्य प्रवेशद्वारावर नऊवारी साडीतील स्वागतिका संगीत मैफलीला येणाऱ्या संगीत रसिकांचे स्वागत करणार आहेत. येथील सजावट आणि एकूण प्रकाशयोजना अस्सल भारतीय संगीत परंपरेला साजेशी असणार आहे. निवेदनातही ‘विरासत’ जपलेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि त्यांचा मुलगा केतन गाडगीळ ही पिता – पुत्राची जोडी करणार आहे. पुण्याच्या ‘विरासत’ मधे मानाचे स्थान असलेले पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती व त्यांची धुरा पुढे चालवणारे त्यांचे सुपुत्र डॉ. पराग संचेती आणि कन्या  मनीषा संचेती-संघवी, यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात येणार आहे’,असेही  रानडे यांनी नमूद केले.  

‘या कार्यक्रमासाठी दोन हजार ते अडीचशे रुपयांपर्यंतची तिकीटे उपलब्ध असून ती टिळक स्मारक मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी नऊ ते साडे अकरा आणि संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत मिळू शकतील तसेच; ‘बुक माय शो’ वर ऑनलाईन तिकीट विक्री सुरू आहे. ग्रुप बुकिंगसाठी ९१४५५०८०८८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे  समीर हंपी यांनी या वेळी सांगितले.


कार्यक्रमाविषयी : 
‘विरासत’ संगीत महोत्सव 
दिवस : गुरुवार, १५ फेब्रुवारी २०१८
वेळ : संध्याकाळी साडे सहा 
स्थळ : महालक्ष्मी लॉन्स, डी.पी.रोड, राजाराम पुलाजवळ.
तिकीट विक्री : बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक – सकाळी ९ ते ११.३० आणि संध्याकाळी ५ ते ७.
ग्रुप बुकींगसाठी : ९१४५५०८०८८
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link