Next
‘सिंहगड’ स्पोर्ट्स करंडकची यशस्वी सांगता
प्रेस रिलीज
Wednesday, January 23, 2019 | 12:29 PM
15 0 0
Share this article:पुणे : सिंहगड इन्स्टिट्यूटतर्फे सिंहगड स्पोर्ट्स करंडकची सांगता नुकतीच करण्यात आली. या स्पर्धा सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सचिव सुनंदा नवले, उपाध्यक्ष (एचआर) रोहित नवले, उपाध्यक्ष (अॅडमिन) रचना नवले-अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी भरविल्या जातात. या वर्षीही क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल व व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धा आंतरराष्ट्रीय, आंतर महाविद्यालयीन व सिंहगड अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन अशा तीन विभागांमध्ये घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धा सिंहगड इन्स्टिट्यूटच्या लोणावळा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणावर झाल्या. विद्यापीठांतर्गत शिक्षण घेत असलेल्या सुदान, नेपाळ, श्रीलंका, इराक, अफगानिस्तान, येमेन व टांझानिया या देशातील एकूण २६० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.आंतरराष्ट्रीय गट
क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान अ विरुद्ध अफगान लॉयन या सामन्यात अफगाणिस्तान अ संघाने १३ ओव्हरमध्ये आठ बाद १०२ धावा केल्या. अफगान लॉयन संघाने सहा बाद ९५ धावा केल्या. श्रीलंका विरुद्ध नेपाळ सामन्यात श्रीलंका संघाने चार बाद ८४ धावा केल्या. नेपाळ संघाने आठ बाद ८१ धावा केल्या. फुटबॉल (मुली) स्पर्धेत श्रीलंका विरुद्ध नेपाळ या सामन्यात नेपाळ संघाने ४-१ असा विजय मिळविला. बास्केटबॉल (मुले) स्पर्धेत साउथ सुदान विरुद्ध नेपाळ सामन्यात साउथ सुदान संघाने ३७-२१ असा विजय मिळविला.आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा गट
या गटात आयोजित केलेल्या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील एकूण १४ संघ सहभागी झाले होते. बाद पद्धतीच्या सामन्यांमध्ये क्राइस्ट कॉलेज वडगाव शेरी व अरिहंत महाविद्यालय यांनी अंतिम फेरीत प्रवेश करून अंतिम सामन्यांमध्ये क्राइस्ट महाविद्यालयाने १-० असा विजय मिळविला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण लोणावळा संकुलाचे संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, सिंहगड स्पोर्ट्स करंडकचे क्रीडा संचालक प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले व प्राचार्य डॉ. आर. एस. प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले.सिंहगड इन्स्टिट्यूट अंतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गट
या गटात क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, लॉन टेनिस, १०० मीटर धावणे, ४ बाय १०० मीटर धावणे व स्विमिंग या स्पर्धा घेण्यात आल्या. क्रिकेट (मुले) स्पर्धेत एकूण २८ महाविद्यालये सहभागी झाली होती. उपांत्यपूर्व फेरीमध्ये एसआयटी लोनावळा, एन. बी. नवले कॉलेज, लोणावळा एससीओएस आंबेगाव व एससीओई वडगाव या चार संघांनी प्रवेश केला. अंतिम सामना एन. बी. नवले महाविद्यालय व एसआयटी लोणावळा यांच्यात झाला. एसटी लोणावळा संघाने १६६ धावा केल्या व एन. बी. नवले महाविद्यालयाने अतिशय रंगतदार चमकदार खेळी करून शेवटच्या षटकांमध्ये विजय मिळविला. एन. बी. नवले महाविद्यालयाने या स्पर्धेत सलग दुसऱ्यावर्षी विजय मिळविला.

बॅडमिंटन (मुले व मुली) स्पर्धेत एकूण २८ महाविद्यालयांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. मुलांमध्ये एसकेएनसीओइ वडगाव महाविद्यालयाने प्रथम, तर एससीओई वडगाव महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकाविला. मुलींमध्ये एन. बी. नवले महाविद्यालयाने प्रथम, तर एससीओएस आंबेगाव महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकाविला. फुटबॉल (मुले व मुली) स्पर्धेत एकूण २८ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते. मुलांमध्ये एसकेएनसीओइ वडगाव संघाने प्रथम आणि एसकेएनएसआयटीएस लोणावळा संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. मुलींमध्ये एसआयपीएस लोणावळाने प्रथम, तर एसव्हीसीपी वडगाव संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.

कबड्डी स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी झाले होते. यात एससीओएस आंबेगाव या संघाने प्रथम, तर एसआयटी लोणावळा संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. १०० मीटर (मुले व मुली) धावण्याच्या स्पर्धेत एकूण ७० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. मुलांच्या स्पर्धेत एसआयटीएस नऱ्हे संघाने प्रथम, तर एसआयटी लोणावळा संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. मुलींमध्ये एसएई कोंडवा संघाने प्रथम आणि एसबीएस एरंडवणे संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.४ बाय १०० रिले (मुले व मुली) या स्पर्धेमध्ये एकूण २४ संघाने सहभाग नोंदविला व मुलांच्या स्पर्धेत एसआयटीएस नऱ्हे संघाने प्रथम व एसआयटी लोणावळा संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींच्या स्पर्धेमध्ये एकूण २१ संघाने सहभाग नोंदविला व एसएई कोंडवा या संघाने प्रथम व एससीओई वडगाव या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. लॉन टेनिस मुले सिंगल्स या स्पर्धेमध्ये एसकेएनसीसी एरंडवणे संघाने प्रथम क्रमांक व एससीओएस आंबेगाव संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. लॉन टेनिस मुले डबल्स या स्पर्धेमध्ये एसकेएनसीसी एरंडवणे या संघाने प्रथम व एनबीएनएसएसओई आंबेगाव या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.लॉन टेनिस मिक्स डबल्स या स्पर्धेमध्ये एसकेएनसीसी एरंडवणे या संघाने प्रथम व एससीओएस आंबेगाव या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. बास्केट बॉल मुलांच्या स्पर्धेत एसएई कोंडवा प्रथम क्रमांक व एसआयटीएस नऱ्हे या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. मुलींच्या स्पर्धेमध्ये एससीओइ वडगाव या संघाने प्रथम व एसकेएनसीओ वडगाव या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.

या स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करण्यासाठी लोणावळा संकुलातील सर्व महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jayawant Desai About 212 Days ago
Great,thanks
0
0

Select Language
Share Link
 
Search