Next
‘आय फायनान्स’ची २१.५ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी
प्रेस रिलीज
Tuesday, June 12, 2018 | 02:52 PM
15 0 0
Share this story

मुंबई : सुक्ष्म आणि लघुउद्योगांना परवडण्याजोग्या दराने कर्ज देणारी आय फायनान्स ही गुडगावस्थित बँकेतर वित्तीय संस्था कॅपिटलजीकडून (आधीची गुगल कॅपिटल) इक्विटी इन्व्हेस्टमेंट प्राप्त करणारी भारतातील पहिली फायनान्स  कंपनी बनली आहे. आपल्या सिरीज सी राउंडमध्ये, ‘आय’ने २१.५ दशलक्ष डॉलर्सची (१४७ कोटी रुपये) निधी उभारणी केली आहे.

या कंपनीचे आधीचे गुंतवणूकदार ‘एसएआयएफ’ पार्टनर्स आणि ‘एलजीटी’ यांनीही इक्विटी राउंडमध्ये सहभाग घेतला. ‘आय’ या फंडाचा वापर व्यवसाय वाढीसाठी आणि आपल्या फायनान्शियल टेक्नॉलॉजीमधील आघाडीचे स्थान कायम ठेवण्यासाठी करणार आहे. बंगलोर स्थित युनिटस कॅपिटल आयसाठी व्यवहार सल्लागार होते, तर जेएसए व इंडसलॉ हे कायदेशीर सल्लागाराची भूमिका बजावली.

‘आय’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक संजय शर्मा म्हणाले, ‘कॅपिटलजी सोबतच्या आमच्या भागिदारीबाबत आम्ही अत्यंत उत्साहित आहोत. आम्ही भारतभरातील आर्थिकदृष्ट्या वगळण्यात आलेल्या सूक्ष्म उद्योजकांना परवडणारे व्यवसाय कर्ज देण्यासाठी अभ्यासपूर्ण डेटा मॉडेल्स व तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कॅपिटलजीचा अॅनालिटिक्स व टेक्नॉ‍लॉजीचा वापर करत व्यवसाय विस्ता‍र करण्यामधील गुगल तज्ञतेतील अॅक्सेस आमच्या दृष्टिकोनाला अत्यंत पूरक असेल. आम्ही एका उत्तम स्थितीत आहोत, जेथे बिझनेस मॉडेल सिद्ध झाले आहे आणि अधिक चांगल्याप्रकारे विस्तारही साधत आहे.’

‘आमचा हेतू मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित एसएसएमई फायनान्स मार्केटला व्यापून घेण्याचा आहे, जेथे इतर वित्तीय पुरवठादारांना सेवा देणे कठीण वाटते. आम्ही अत्यं‍त आनंदित आहोत की, आमचे सध्याचे गुंतवणूकदार, एसएआयएफ पार्टनर्स व एलजीटी यांनी देखील इक्विटीच्या नवीन राऊंडमध्ये सहभाग घेतला, ज्यामुळे भारतातील सूक्ष्म व छोट्या प्रमाणावरील उद्योगाचे परिवर्तन करण्याच्या आयच्या क्षमतेवरील असलेला त्यांचा विश्वास दिसून येतो,’ असे शर्मा यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link