Next
‘विमानतळासाठी भू-संपादन प्रक्रिया गतीने राबवावी’
डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आदेश
BOI
Wednesday, September 04, 2019 | 06:04 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाला आवश्यक असणारी लोहगाव विमानतळालगतची जागा खासगी व्यक्तींकडून संपादित करण्याबाबतची प्रक्रिया गतीने राबवावी,’असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले.

विमानतळ प्राधिकरणाला आवश्यक जागा संपादनाबाबत   बुधवारी, तीन सप्टेंबर २०१९ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या वेळी ते म्हणाले, ‘प्राधिकरणाला लागणाऱ्या जागेबाबत महानगरपालिका स्तरावर घेणारे निर्णय महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी तात्काळ घ्यावेत. जागा शासनास हस्तांतरित करण्यास इच्छुक असणाऱ्या जागा मालकाचे संमतीपत्र करून घेऊन या जागेचा प्रचलित दरानुसार मोबदला लवकरात लवकर संबंधितांना देण्यात यावा. महानगरपालिका स्तरावर होणारे निर्णय तत्काळ घ्यावे; तसेच अन्य निर्णयांबाबतचा प्रस्ताव राज्य शासनासकडून येणाऱ्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करावी.’

या वेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search