Next
राज्यस्तरीय कला महोत्सवाचे आयोजन
देशभरातील २००हून अधिक कलाकारांचा सहभाग
BOI
Wednesday, January 23, 2019 | 03:59 PM
15 0 0
Share this article:

पुणे : सालाबादप्रमाणे यंदाही ‘चित्रलिला निकेतन कला महाविद्यालय’ व ‘शिवस्फूर्ती प्रतिष्ठान’ यांच्या वतीने २३ ते २७ जानेवारीदरम्यान ‘कलाविश्व २०१९’ या राज्यस्तरीय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून ‘कलर रेड (Colour Red)’ अशी महोत्सवाची यंदाची थीम आहे.

‘कलाविश्व २०१९’ हा कला महोत्सव २३ ते २७ जानेवारीदरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कला दालन येथे होणार आहे. ‘मागील पाच वर्षांपासून कलाविश्वतर्फे राज्यस्तरीय स्पर्धा व प्रदर्शन आयोजित केले जात आहे. परंतु यंदा त्याचे स्वरूप अधिक व्यापक झाले असून या राज्यस्तरीय स्पर्धेस या वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे’, अशी माहिती शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे सचिव प्रज्ञेश मोळक यांनी दिली.

या महोत्सवाचे उद्घाटन अनोख्या पद्धतीने करण्यात येणार आहे. बुधवारी (२३ जानेवारी) सायंकाळी पाच वाजता घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात सुप्रसिद्ध अभिनेते सुयश टिळक यांच्या हस्ते ते होईल. त्याचबरोबर ज्येष्ठ मूर्तिकार प्रमोद कांबळे हे उद्घाटनप्रसंगी आपली कला मूर्तीद्वारे प्रात्यक्षिक (Sculpture Demo) देऊन प्रत्यक्षरीत्या सादर करणार आहेत. याप्रंसंगी या प्रात्यक्षिकाला संगीताची साथ असणार आहे. विविध कलागुणांनी यंदाच्या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. उद्घाटनानंतर सुयश टिळक यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रमदेखील होणार आहे. एकूण रुपये ७५ हजारांची पारितोषिके या कला महोत्सवात प्रदान करण्यात येणार आहेत. या वेळी सुयश टिळक उपस्थित प्रेक्षकांशी संवादही साधणार आहेत. 

या राज्यस्तरीय कला स्पर्धेसाठी यंदा २००हून अधिक स्पर्धकांनी महाराष्ट्रासह देशभरातून सहभाग नोंदवला आहे. यातील निवडक १०० प्रदर्शनीय कलात्मक आविष्कारांचे प्रदर्शन पुणेकरांना या महोत्सवाच्या स्थळी पाहता येणार आहे. कला महाविद्यालयीन विद्यार्थी, खुला गट व व्यावसायिक कलाकार अशा तीन भागांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पेंटिंग्ज, फोटोग्राफी, पेपर आर्ट, क्राफ्ट, म्युरल्स, इन्स्टॉलेशन्स इत्यादी क्षेत्रांतील कलाकारांनी सहभाग घेतला आहे. कलर रेड (Colour Red) ही महोत्सवाची यंदाची थीम असल्यामुळे या कलाकारांनी फक्त लाल रंगावर हे काम केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search