Next
ब्रिटिश कौन्सिलतर्फे ‘स्टडी यूके फेअर’चे पुण्यात आयोजन
BOI
Tuesday, February 05, 2019 | 06:24 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ब्रिटिश कौन्सिल या युकेच्या शैक्षणिक संधी व सांस्कृतिक संबंधांसाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे शुक्रवारी, सहा  फेब्रुवारी २०१९ रोजी ‘स्टडी यूके फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना उपलब्ध शिष्यवृत्ती पर्यायांबद्दल माहिती दिली जाईल. हा कार्यक्रम हॉटेल शेरेटन ग्रँड येथे दुपारी दोन ते सांयकाळी सात दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

एकाच छताखाली युकेच्या आघाडीच्या विद्यापीठांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. या दरम्यान यूकेमधील शैक्षणिक संधींबद्दल, तसेच युके व्हिसा व इमिग्रेशन ऑफिसर्सतर्फे चर्चासत्र होणार आहे. यूकेमध्ये शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनाही या कार्यक्रमात सहभागी होता येणार असून, यामध्ये त्यांना २२ युकेस्थित संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधता येणार आहे;तसेच विविध अभ्यासक्रम, व्हिसा, अर्ज,शिष्यवृत्ती आणि इतर संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ असेल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search