Next
आशा जाधव शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित
मिलिंद जाधव
Saturday, October 27 | 04:38 PM
15 0 0
Share this story



वसई : तालुक्यातील कामण केंद्रातील खिंडीपाडा जिल्हा परिषद शाळेच्या सहशिक्षिका आशा चिंतामण जाधव यांना सन २०१८-१०१९ वसई तालुकास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आशा जाधव या गेल्या २६ वर्षांपासून कार्यरत असून, १२ वर्षे त्यांनी वाडा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागात सेवा बजावली आहे. २००५पासून त्या वसई तालुक्यातील कामण परिसरात काम पाहत आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्या नेहमीच विविध शालेय उपक्रम राबवित असतात.

जाधव यांच्या या कार्याची दखल घेत वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने सन २०१८-२०१९ या वर्षाचा तालुकास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार पंचायत समितीचे सभापती संजय म्हात्रे यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार हितेंद्र ठाकूर उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या शिक्षकांचे कौतुक आमदार ठाकूर यांनी केले; तसेच शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या वेळी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, शिक्षक आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link