Next
महाराष्ट्राला दुष्काळ निवारणासाठी साडेचार हजार कोटी
BOI
Wednesday, January 30, 2019 | 04:17 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : केंद्र शासनाने महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी चार हजार ७१४ कोटी २८ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, २९ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या समितीने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्रासह देशातील नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेली सहा राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी एकूण सात हजार २१४ कोटी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली. 


मागील वर्षी महाराष्ट्रात आलेल्या गंभीर दुष्काळाच्या परिस्थितीवर उपाय योजना करण्यासाठी राज्याने केंद्र शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी राज्याने सादर केलेला मदत निधी प्रस्ताव लवकर मंजूर करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, राज्याला चार हजार ७१४ कोटी २८ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल, कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्यासह गृहमंत्रालय, अर्थमंत्रालय, कृषीमंत्रालय व निती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 88 Days ago
Is anybody studying the increasing desertification of Marathawada? Is money allocated to this study ? This not a matter of party-politics .
0
0

Select Language
Share Link
 
Search