Next
अंब्रेला पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, September 05 | 12:43 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल ऑफ आर्टच्या वतीने अंब्रेला पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा आठ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत होणार आहे.

‘ही कार्यशाळा आझम कॅंपस येथील हॉटेल मॅनेजमेंट बिल्डिंगजवळील स्कूल ऑफ आर्ट येथे होणार आहे. मुंबई येथील आर्टिस्ट रूपेश बसूतकर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यात छत्रीवर कॅलिग्राफी हा वेगळा कार्यानुभव विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे’, अशी माहिती स्कूल ऑफ आर्टच्या संचालक हेमा जैन यांनी दिली.

कार्यशाळेत ‘लेट्स वॉक विथ कलर्स इन द रेन’ या संकल्पनेवर आधारित रंगकामाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना रंगकामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचे हेमा जैन यांनी सांगितले.

कार्यशाळेविषयी :
दिवस :
शनिवार, आठ सप्टेंबर २०१८
वेळ : सकाळी दहा ते दुपारी दोन
स्थळ : स्कूल ऑफ आर्ट, हॉटेल मॅनेजमेंट बिल्डिंगजवळ, एमसीई सोसायटी, आझम कॅंपस, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link