Next
डीकेटीईमध्ये पासपोर्ट मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, November 27 | 05:16 PM
15 0 0
Share this story

पासपोर्ट मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, डॉ. सपना आवाडे, डॉ. अशोक सौंदत्तीकर, राजेश पाटील संस्थेचे डायरेक्टर डॉ पी. व्ही. कडोले आदी.

इचलकरंजी : पुणे येथील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आपले सरकार सेवा केंद्र यांच्या वतीने डीकेटीईच्या टेक्स्टाइल अँड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये २७ नोव्हेंबर २०१८ रोजी पासपोर्ट मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या प्रतिसादामुळे हा मेळावा आणखी दोन दिवस सुरू राहणार आहे.
भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या ‘जेथे नागरिक तेथे पासपोर्ट’ या संकल्पनेतून हा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे व नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.  

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी डीकेटीईमध्ये आज सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्या दिवशी सुमारे ४०० हून अधिक नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, गृहीणी, नागरिक, लहान मुलांचा लक्षणीय सहभाग होता. डीकेटीईमार्फत इचलकरंजी व आसपासच्या भागातील लोकांसाठी एकाच छताखाली पासपोर्ट अर्ज भरण्याची सोय केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. हा मेळावा २८ व २९ नोव्हेंबर रोजी सुरू राहणार आहे.

आज सकाळी १० वाजता गृहिणींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने, तर नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनतर आधार कार्ड, पॅनकार्ड, शैक्षणिक कागदपत्रे आदींच्या मूळ व झेरॉक्स प्रतींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थिती लावली.

या मेळाव्याला संस्थेच्या सचिव डॉ. सपना आवाडे, डॉ. अशोक सौंदत्तीकर, राजेश पाटील, संस्थेचे डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले यांच्यासह सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link