Next
पर्सिस्टंट कंपनीत योग दिवस साजरा
प्रेस रिलीज
Friday, June 22 | 01:47 PM
15 0 0
Share this story

पुणे : वेळेशी, ताणतणावाशी स्पर्धा करीत काम करणाऱ्या पुण्यातील सॉफ्टवेअर कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग साधनेची दीक्षा घेतली. अमृत योग साधना समूहातर्फे पर्सिस्टंट कंपनीत योग दिवस साजरा करण्यात आला.

मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके करण्यात आली. ‘पर्सिस्टंट’ समूहाचे अध्यक्ष आनंद देशपांडे, वृंदा पारसनीस, सिद्धार्थ पेंडसे हेही यात  सहभागी झाले होते. अमृत योग साधनेचे साधक सचिन सुभेदार,पल्लवी पाटील, अपूर्वा देशपांडे, गिरीजा, सोनम, रूपाली यांनी प्रात्यक्षिके सादर केली. या वेळी एक ते १०८ सूर्यनमस्कार मंत्र पठणासह सादर करण्यात आले.  

‘स्पर्धेच्या युगात कामाचे ताण, व्याधी, मानसिक असंतुलन यांचा सामना करण्यासाठी भारतीय योग साधना उपयुक्त आहे,’ असे प्रतिपादन मिलिंद देशपांडे यांनी या प्रसंगी केले. हा उपक्रम ‘पर्सिस्टंट’च्या सर्व कार्यालयांमध्ये सकाळी साडेसात वाजता साजरा झाला.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link