Next
डॉ. विनय कुमार यांना अंजनी माशेलकर पुरस्कार
प्रेस रिलीज
Monday, November 19, 2018 | 03:06 PM
15 0 0
Share this storyपुणे : बाणेर रस्त्यावरील यशदा येथे आयोजित केलेल्या सहाव्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन (एनसीएसआय) या परिषदेत संशोधक डॉ. विनय कुमार यांना या वर्षीचा ‘अंजनी माशेलकर इन्क्ल्यूजिव्ह इनोव्हेशन अॅवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले.

पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ व ‘पीआयसी’चे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, इंटरनॅशनल लॉंन्जिव्हिटी सेंटरचे (आयएलसी इंडिया) अध्यक्ष जयंत उमराणीकर, ‘पीआयसी’चे मानद संचालक प्रशांत गिरबने, ‘आयएलसी इंडिया’च्या कार्यकारी संचालिका अंजली राजे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कुमार यांनी मधुमेह व्यवस्थापन, मूत्रपिंड निकामी होणे, रक्तक्षय वकुपोषण यासाठी आवश्यक अशा चाचण्या करणाऱ्या उपकरणाचे संशोधन केले आहे. ‘अणुपाथ’ असे या उपकरणाचे नाव असून, यामध्ये रक्त व मूत्राच्या एकूण आठ चाचण्या करता येतात. हे उपकरण सहज हाताळण्याजोगे व कुठेही घेऊन जाता येण्याजोगे (पोर्टेबल) असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल. याशिवाय या उपकरणामुळे रुग्णाची रक्तातील साखर आत्ता किती आहे हे पाहण्याबरोबरच मागील काही महिन्यांचे रुग्णाचे मधुमेह व्यवस्थापन कसे होते याचा अहवाल उपलब्ध होतो.

‘टाटा ट्रस्टचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी याचा उपयोगही करीत आहेत. या उपकरणात एक लाख चाचणी रिपोर्ट्स साठवणे शक्य आहे. ‘एचबीएवनसी’ या मधुमेहाविषयक चाचणीसाठी अंदाजे ६०० ते एक हजार रुपये खर्च येत असताना या उपकरणाच्या माध्यमातून ही चाचणी केल्यास केवळ ९० ते १०० रुपये इतकाच खर्च येतो,’ अशी माहिती डॉ. कुमार यांनी दिली.

या परिषदेसाठी निवड झालेल्या १८ संशोधकांना बापट यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘चांगले काम करणाऱ्यांना पुरस्कार मिळणे ही त्यांच्यासाठी प्रेरणादायी गोष्ट असते. त्यामुळे ‘पीआयसी’ आपल्या या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन परिषदेद्वारे त्यांचे करीत असलेले कौतुक हे वाखाणण्याजोगे आहे.’

‘देशात नाविन्यपूर्ण काम करणारे अनेक संशोधक आहेत. त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या संशोधनात गुंतवणूक केली, तर त्याचा निश्चित फायदा होईल,’ असे मत यावेळी डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केले.

अंजली राजे यांनी सूत्रसंचलन केले. जयंत उमराणीकर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link