Next
समाजभूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
BOI
Friday, May 31, 2019 | 04:25 PM
15 0 1
Share this article:

अहमदनगर :  समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना रयत प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार; तसेच रयतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाचे हे पुरस्काराचे तिसरे वर्ष असून, या वर्षीच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

‘सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, क्रीडा, पत्रकारिता, पर्यावरण, उद्योजकता, स्त्री सक्षमीकरण, शासकीय सेवेतील कार्य, सामाजिक संस्था, हॉस्पिटल्स आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणार्याद व्यक्तींना २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती ‘रयत’चे प्रा. सीताराम जाधव यांनी सांगितले.

इच्छुकांनी आपली माहिती दोन पासपोर्ट फोटोसह द्वारा श्री. अर्जुन नारायण जाधव. मु. पो. दौलावडगाव, ता. आष्टी, जि. बीड या पत्त्यावर १५ जून २०१९ पर्यंत पाठवावी, असे आवाहन संयोजक समितीने केले आहे. या दिवशी भव्य मोफत आरोग्य शिबिर, शाहिरी, व्याख्यान आदींचे आयोजन करण्यात आले आहे.
 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search