Next
‘चांद्रयान-दोन’ मोहिमेवर मंगळवारी व्याख्यान
अपूर्वा जाखडी आणि लीना बोकील मार्गदर्शन करणार
BOI
Friday, August 02, 2019 | 03:36 PM
15 0 0
Share this article:


पुणे : मराठी विज्ञान परिषद आणि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इस्रो चांद्रयान- दोन मोहीम व अवकाश मोहिमेत युवकांना उपलब्ध संधी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. येत्या मंगळवारी, सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या सभागृहात हे व्याख्यान होणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. 

अपूर्वा जाखडी आणि लीना बोकील

भारतातील नासाच्या प्रतिनिधी अपूर्वा जाखडी आणि लीना बोकील या मार्गदर्शन करणार आहेत. अमेरिकेच्या सॅन डिएगो येथे नासामार्फत आयोजित अंतराळ संशोधन अभ्यासासाठी अपूर्वा आणि लीना यांना निवडले होते. अपूर्वा अवकाश शिक्षिका, तर लीना उद्योजिका आहेत.

‘इस्रोच्या ‘चांद्रयान-दोन’चे २२ जुलैला यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सात सप्टेंबर रोजी ‘विक्रम’ लँडर अलगदपणे उतरणार आहे. त्यानंतर ‘प्रज्ञान’ नावाचा रोव्हर तेथील माहिती संकलन करून ती इस्रोला पाठवणार आहे. ही मोहीम कशा प्रकारे काम करते? या मोहिमेचा उद्देश काय? तसेच अवकाश तंत्रज्ञानात युवकांना कोणत्या संधी आहेत, अशा विविध मुद्यांवर अपूर्वा जाखडी आणि लीना बोकील बोलणार आहेत,’ अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र. यांनी दिली. 

कार्यक्रमाविषयी :

‘चांद्रयान-दोन’ मोहिमेविषयी व्याख्यान
स्थळ : इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सचे सभागृह, शिवाजीनगर 
दिवस : मंगळवार, सहा ऑगस्ट २०१९
वेळ : संध्याकाळी सहा वाजता 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search