Next
‘मनरेगा’त महिलांचा सहभाग लक्षणीय
या वर्षी नाशिक विभागात दीड लाख महिला मजुरांचा समावेश
BOI
Thursday, November 29 | 11:48 AM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटोनाशिक : शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) महिलांचा सहभाग लक्षणीय असून, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरण व सबलीकरणासाठी ही योजना लाभदायी ठरत आहे. या योजनेअंतर्गत नाशिक विभागात २०१८-१९ या वर्षात दोन लाख ४२ हजार ४६६ कुटुंबांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. यात एक लाख ५४ हजार ८९४ इतक्या महिलांचा सहभाग आहे. उत्तर महाराष्ट्रात ‘मनरेगा’ ही एक आदर्श योजना ठरत आहे.

रोजगाराच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला किमान उपजीविकेचे साधन निर्माण व्हावे, रोजगार निर्मिती व्हावी, ग्रामीण भागातील अकुशल बेरोजगारांना किमान रोजगार मिळावा, या उद्देशांनी सुरू केलेल्या ‘मनरेगा’मध्ये महिलांनाही रोजगार मिळून त्यांच्या मुलाबाळांना किमान पोटाची खळगी भरता यावी यासाठी महिला मजुरांचे सक्षमीकरण व सबलीकरण केले जात आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील विधवा, परितक्ता व निराधार महिलांना वर्षभरात किमान १०० दिवस रोजगार देण्याची तरतूद आहे.

या योजनेअंतर्गत रोजगारासाठी जॉब कार्ड काढल्यानंतर विशिष्ट कालावधीत जॉब कार्डधारकाला रोजगार पुरविण्याची जबाबदारी क्षेत्रीय स्तरावर काम करणार्‍या अधिकार्‍यांची असते. महिलांमध्ये कामांबाबत जागृती निर्माण करणे, कामाची मागणी, त्याचे नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण, तसेच कामाची देखभाल व दुरुस्ती यासाठी स्वयंसहायता गट स्थापन करून महिला समुहाचा सहभाग वाढवण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.

नाशिक विभागाचा विचार केल्यास ‘मनरेगा’अंतर्गत महिला मजूरांची संख्या अहमदनगरमध्ये ७० टक्के आहे. धुळ्यात ७४ टक्के, जळगावमध्ये ५२ टक्के, नंदुरबारमध्ये ६१.५० टक्के, तर नाशिकमध्ये ६१.२९ टक्के इतक्या महिला मजूर आहेत. या विभागात धुळे जिल्ह्यात महिला मजुरांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील महिला मजूरांचे सक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या या योजनेला महिलांचाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळत आहे, हेच या योजनेचे फलित आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link