Next
खावे त्याच्या देशा
BOI
Saturday, October 28 | 11:47 AM
15 0 0
Share this story

भारतीय खाद्यजीवन समृद्ध आहे; तसेच परदेशातही चवीढवीचे नाना प्रकार पाहायला मिळतात. अनिल नेने यांचे हे पुस्तक वाचून, तर याची खात्रीच पटते. कारण आपण कधी विचार केलेला नाही, अशा खाद्यप्रकारांची माहिती ते या पुस्तकातील लेखांमधून देतात.

कॅव्हिआर हा रशियन नि इरेनियन प्रकार, शाही जेवणाची राणी ट्रफल, इटलीचा रिसोटो यांसारख्या पदार्थांची वर्णने पुस्तकात वाचायला मिळतात. हॅम, सॉसेजेस, स्टेक यांसारख्या मांसाहारी पदार्थांबरोबरच फेझंट नावाच्या पक्ष्याच्या मांसाची लज्जत त्यांनी कशी चाखली याचे रंजक वर्णन सापडते. बटाट्यापासून आणि चीजपासून बनवले जाणारे रुचकर पदार्थ, डेझर्ट नि पुडिंगसारख्या खास गोड पदार्थांची माहिती मिळते.

एवढेच नव्हे, तर स्कॉच व्हिस्की, वाइनसारखी पेयेही स्वतंत्र प्रकरणांमधून भेटतात.

प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स
पाने : २२०
किंमत : ३०० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link