Next
डोंगरपाडा जिल्हा परिषद शाळेत ‘मुलगी वाचवा अभियान’
मिलिंद जाधव
Tuesday, March 05, 2019 | 01:46 PM
15 0 0
Share this article:भिवंडी : तालुक्यातील कांबे केंद्रातील डोंगरपाडा जिल्हा परिषद शाळेत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त गावात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची प्रभातफेरी काढण्यात आली.

या वेळी विविध घोषणा देऊन परिसरात या अभियानाविषयी सकारात्मक वातावरण निर्मिती करण्यात आली. ‘संवाद  तुझा माझा’ या उपक्रमात मुली सहभागी झाल्या होत्या. ग्रामपंचायत सदस्य राम मोरगा व सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी बोलताना सहशिक्षक गायकवाड म्हणाले, ‘महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध, पीर्यदर्शी सम्राट अशोक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडात  स्त्रियांना मानसन्मान मिळत होता. स्त्रिया सत्ताधारी होत्या. हाच आदर्श आपण सर्वांनी समोर ठेऊन स्त्रियांना आदर दिला पाहिजे. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे स्त्रिया  अंधश्रद्धेला बळी पडू लागल्या. स्त्रियांना फक्त चूल आणि  मूल एवढेच विश्व राहिले; परंतु महात्मा ज्योतिबा फुले व स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. म्हणून आजची स्त्री शिकू लागली, प्रगती करू लागली.’‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिले. त्या संविधानात सर्व हक्क अधिकार दिले. म्हणून आज आपण मान सन्मानाने, स्वाभिमानाने जगू शकतो. तरीसुद्धा आज या देशामध्ये स्त्रियांना कमी लेखले जाते. मुलीला गर्भात मारले जाते. मुलगा-मुलगी या दोघांमध्ये भेदभाव केला जातो. मुलीला कमी शिक्षण व मुलाला जास्त शिक्षण दिले जाते. जेव्हा सर्व भारतीय डॉ. आंबेडकर यांनी दिलेले संविधान आचरणात आणतील तेव्हा ही समस्या संपलेली असेल. आजची मुलगी ही उद्याची स्त्री, माता आहे. म्हणून  स्त्रियांनीच स्त्रियांचा मानसन्मान वाढवला पाहिजे,’ असे गायकवाड यांनी सांगितले.या वेळी विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ असा सामाजिक संदेश दिला. या प्रसंगी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सुशीला दिघे, ग्रामपंचायत सदस्य राम मोरघा, सदस्या प्रमिला भोरे, सविता खंदाले, विकास कुचन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक शामकांत नवाळे यांनी केले. गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विजेता विचार फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search