Next
सुखाच्या शोधात
BOI
Tuesday, May 29 | 11:38 AM
15 0 0
Share this story

माणसाच्या जगण्याला केंद्रस्थानी ठेऊन ललिता श्रीपाद सबनीस यांनी हे लेखन केले आहे. विशेषतः स्त्रिया, अनाथ मुले, भटके. उपेक्षित, शेतकरी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. या विषयांवर त्यांनी चिंतनपर वैचारिक लेखन केले आहे. देशात स्त्रीच्या असलेल्या दुय्यम स्थानाला त्या प्रारंभीच्या लेखातच वाचा फोडतात. स्त्री मुक्तीची नांदी, स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीचे दुय्यम स्थान, विधवा आणि कुमारिकांचे मातृत्व असे विषयही त्यांनी हाताळले आहेत.

‘शिक्षणाची दुरवस्था’ या लेखात कायद्याने ज्ञान शिक्षकानेही बाळगायला हवे, असे त्या सांगतात, तर ‘सत्याचा शोध’ या लेखात ‘विज्ञानाच्या प्रयोगशाळेत माणूस महत्त्वाचा ठरतो,’ असे म्हणतात. कौटुंबिक हिंसाचार, अनाथ मुलांचा प्रश्न, घटस्फोट, म्हातारपण, अंधश्रद्धा, देवदासी, व्यसन, तमाशा कलावंत असा विषयांकडेही त्यांनी सजगपणे पाहिले आहे.

प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स
पाने : १०४
किंमत : १२० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link