Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयातही सुरू होणार रेडिओ केंद्र
BOI
Monday, September 24, 2018 | 05:31 PM
15 0 0
Share this story

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘आकाशवाणीवरील कार्यक्रमाची निर्मिती प्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शन करताना आनंद देशमुख.औंध : ‘विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र आणि रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असून, विद्यापीठातील रेडिओ केंद्राप्रमाणेच डॉ. आंबेडकर महाविद्यालयात एक कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू करण्यात येणार आहे;तसेच यानंतर अनेक कार्यक्रम संयुक्त विद्यमाने तयार करण्यात येणार आहेत’,अशी माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ यांनी दिली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात नुकतेच मराठी विभागामार्फत ‘जनसंपर्क आणि पत्रकारिता’ या अभ्यासक्रमांतर्गत ‘आकाशवाणीवरील कार्यक्रमाची निर्मिती प्रक्रिया’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

या वेळी मार्गदर्शन करण्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्रावरील माजी ज्येष्ठ निवेदक आणि गेली २८ वर्षे सवाई गंधर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आनंद देशमुख उपस्थित होते. ते म्हणाले, ‘आपल्या आवाजाला भावना असल्याशिवाय तो आवाज श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचू शकत नाही. आकाशवाणीवरील श्रोता हा अंध व्यक्ती आहे, असे गृहीत धरूनच निवेदकाने निवेदन करायला हवे. अंध व्यक्तीच्या डोळ्यासमोर एखादी वस्तू किंवा प्रसंग उभा करण्याचे कौशल्य निवेदकाच्या बोलण्यामध्ये असायला हवे. प्रत्येक शब्द श्रोत्याच्या अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी, निवेदकाच्या शब्दात आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, भावना असणे गरजेचे असते. आवाजाच्या दुनियेत शब्दांचा वापर करताना, सहज समजतील असे साधे सोपे शब्द वापरावे लागतात;तरच आपले बोलणे दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचू शकते.’ 

‘आपला श्रोता कोणत्या प्रकारचा आहे. त्यानुसार आपण बोलायला पाहिजे. कारण भाषा दर बार कोसांवरती बदलते. उदा. पुणेरी, सातारी, सोलापूरी, आणि मराठवाडी इतर बोली भाषा आहेत. आकाशवाणीवरील निवेदकाने आईचे रूप धारण करून निवेदन केल्यास, श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत आपले बोलणे पोहोचू शकते. निवेदकाने मायक्रोफोनसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केल्यास आवाजाच्या दुनियेत उत्तुंग भरारी घेणे सहज शक्य आहे’, असेही देशमुख यांनी नमूद केले.  

या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्राचे निर्माते महेश जगताप म्हणाले, ‘पुणे विद्यापीठातील केंद्रावर शैक्षणिक आणि सामाजिक स्वरूपाचे उपक्रम सादर केले जातात. हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांमार्फत सादर केले जातात. यामध्ये विविध मुलाखती, पथनाट्य, कथाकथन, कवितावाचन, कादंबरीवाचन इतर प्रकारचे अनेक कार्यक्रम घेतले जातात. आकाशवाणी केंद्रामध्ये करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे.’ 

‘आकाशवाणीवरील कार्यक्रमाची निर्मिती प्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्राचे निर्माते महेश जगताप.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय नगरकर, आभार प्रा. डॉ. अतुल चौरे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सविता पाटील यांनी केले. या वेळी प्रा. सुप्रिया पवार,  प्रा. सायली गोसावी, प्रा. मयूर माळी, प्रा. प्रदीप भिसे आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Galande D.D. About 150 Days ago
Very nice activity. या आगोदरच सुरू होणे आवश्यक होते. Best wishes to your college.
0
0

Select Language
Share Link