Next
नववर्षाच्या स्वागतानिमित्त स्नेहालयात ‘हास्यवर्षाव’
BOI
Wednesday, January 02, 2019 | 05:02 PM
15 0 0
Share this story


अहमदनगर : धमाल विनोद, सिनेकलाकारांच्या हुबेहूब आवाजासहित केलेल्या नकला आणि धमाकेदार गाण्यांवरील नृत्य यामध्ये मुले रंगून गेली होती. निमित्त होते ‘स्नेहालय’मध्ये रंगलेल्या नववर्ष कार्यक्रमाचे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘म्युझिकल हसवा हसवी’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हास्यसम्राट आणि सिनेअभिनेते संतोष चोरडिया व डॉ. कविता खंडेलवाल यांनी धमाल विनोद, सिनेकलाकारांच्या हुबेहूब आवाजासहित नकला करून मुलांना मनसोक्त हसवले. हास्याचे फवारे आणि टाळ्यांच्या गजराने ‘दीनदयाळ सभागृह’ दणाणून जात होते. तर गायक राजेश शिंगाडे, यांनी सादर केलेल्या ‘जिंदगी एक सफर है सुहाना, झिंगाट’ या गाण्यांवर मुलांनी मनसोक्त नृत्य केले. ‘३५ टक्के काठावर पास’ या चित्रपटातील अभिनेत्री आयली घिया हिच्याशी गप्पा मारताना मुले रंगून गेली होती. 


अभिनेत्री डॉ. कविता खंडेलवाल आणि संतोष चोरडिया यांनी गंगी आणि सावळ्या ( मकरंद अनासपुरे) यांच्या आवाजात या कार्यक्रमाची धमाल विनोदी संहिता सादर करीत सूत्रधाराच्या रूपात प्रत्येक वाक्यावर मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. कार्यक्रमाची सांगता ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ या गाण्याने आणि ‘माणसाने माणसांवर प्रेम करावे’ या प्रार्थनेने झाली. 

 ‘एच. आय. व्ही ग्रस्त मुले, लालबत्ती भागातील वंचित मुले, महिला आणि पुरुष यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या स्नेहालयात येऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संतोष चोरडिया, डॉ. कविता खंडेलवाल आणि राजेश शिंगाडे या कलाकारांच्या सेवेला स्नेहालयाचा सलाम!’ अशा शब्दात स्नेहालयाचे संस्थापक आणि प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी या कलाकारांचे आभार मानले. 


‘चांगल्या दर्जाची कला अशा मुलांसमोर सादर करून या कलाकारांनी मुलांना वेगळीच प्रेरणा दिली आहे. जीवनाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचे काम हे सर्व कलाकार करीत आहेत’, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.
 
डॉ. गिरीश कुलकर्णी, स्नेहालयचे सचिव राजीव गुजर, वरिष्ठ सहसंचालक अनिल गावडे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, स्नेहालय यु. के चे विश्वस्त निक कॉक्स आदी मान्यवरांच्या हस्ते या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. 

(‘स्नेहालय’विषयी माहिती देणारा 'बाइट्स ऑफ इंडिया'वरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link