Next
दिव्यांग मुलांसाठी रविवारी आनंद मेळावा
केअरटेकर्स सोसायटीचा अनोखा उपक्रम
BOI
Friday, January 04, 2019 | 12:38 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘केअरटेकर्स सोसायटीच्या वतीने रविवारी, सहा जानेवारी रोजी दिव्यांग मुलांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कॅम्प परिसरातील बाबाजान चौक येथे असलेल्या कॅम्प एज्युकेशन संस्थेच्या मुलींच्या शाळेत संध्याकाळी साडे पाच वाजता हा मेळावा होणार आहे’, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कुमार शिंदे यांनी दिली.

 ‘दिव्यांग, अनाथ, गरीब मुलांना नवीन वर्षाचा घेता यावा यासाठी या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. धायरी, हिंगणे, कोरेगाव भीमा, लोणी काळभोर, वडगाव अशा विविध भागातील १६ सामाजिक संस्था आणि शाळांमधील सुमारे ४५० विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात मुलांसाठी जंपिंग जॅक, आगगाडी, घोडागाडी, बग्गी, बलून फायरिंग, रिंग गेम अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन एकता निराधार संस्थेचे अध्यक्ष सागर रेड्डी यांच्या हस्ते होणार असून, या वेळी खासदार प्रदीप रावत, ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, सुशीलकुमार देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत’, असेही शिंदे यांनी सांगितले.

कार्यक्रमाविषयी 
दिव्यांग मुलांसाठी आनंद मेळावा
स्थळ : कॅम्प एज्युकेशन संस्थेची मुलींची शाळा, बाबाजान चौक, कॅम्प.  
दिवस व वेळ : रविवार, सहा जानेवारी, संध्याकाळी साडे पाच वाजता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
kumar shinde About 170 Days ago
Nice coverages
0
0

Select Language
Share Link
 
Search