Next
माहेर प्रकटन स्पर्धेत सुनंदा कांबळे प्रथम
BOI
Thursday, November 22, 2018 | 05:23 PM
15 0 0
Share this story

सुनंदा कांबळेमालवण : पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माहेर : एक प्रकटन’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विजयदुर्ग येथील सुनंदा कांबळे यांनी त्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रथम तीन क्रमांकांसह तीन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले असून, या सर्वांना २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात गौरविले जाणार आहे. रोख पुरस्कार, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. 

पु. ल. देशपांडे यांच्या सहधर्मचारिणी सुनीताबाई देशपांडे यांचे माहेर मूळ धामापूर, मालवणचे. ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकात त्यांनी आपल्या माहेराचे वर्णन केले आहे. ‘कोमसाप’च्या मालवण शाखेच्या महिला सदस्यांनीदेखील अशा प्रकारे आपले माहेर शब्दद्ध करावे, यासाठी ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे आजीव सदस्य तुकाराम रामचंद्र पडवळ यांनी या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी आलेल्या लेखांचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिका मेघना जोशी यांनी केले. 

विजेत्यांची नावे :
प्रथम - सुनंदा कांबळे, विजयदुर्ग; द्वितीय - अनुराधा आचरेकर; आचरा; तृतीय - तेजल ताम्हणकर, बागायत मसुरे. 
उत्तेजनार्थ : साक्षी कुबल, आचरा; शर्वरी सावंत, मालवण; रश्मी आंगणे

‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचा आनंद मेळावा आचरे बागजामडूल येथे होणार आहे. त्या कार्यक्रमात पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अनिरुद्ध लक्ष्मण आचरेकर About 87 Days ago
सर्वांचे मनापासून अभिनंदन.
0
0

Select Language
Share Link