Next
‘डेल’चा ‘टाटा क्लासएज’शी सहयोग
प्रेस रिलीज
Monday, June 11, 2018 | 12:38 PM
15 0 0
Share this story

बेंगळुरू : ‘डेल आरंभ’ हा शैक्षणिक उपक्रमासाठी तयार केलेला पर्सनल कॉम्प्युटर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘डेल’ने ‘टाटा क्लासएज’ या तंत्रज्ञानावर आधारित अध्ययन सोल्युशन्स पुरवणाऱ्या अग्रगण्य कंपनीसोबत सहयोगाची घोषणा केली. डिजिटल प्रशिक्षण शाळांपर्यंत घेऊन जाण्याच्या, तसेच हे तंत्रज्ञान वर्गांमध्ये अंमलात आणण्यासाठी आवश्यक ते ज्ञान शिक्षकांना देण्याच्या उद्देशाने ही भागीदारी करण्यात आली आहे. या सहयोग करारामुळे ‘डेल आरंभ’ ‘टाटा क्लासएज’च्या शिक्षण संस्थांतील नेटवर्कच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे.

पर्सनल कॉम्प्युटर अर्थात पीसीचे शिक्षणातील महत्त्व समजलेल्या आणि अधिक चांगल्या अध्ययनासाठी पीसी वापरातील नवीन घडामोडींसोबत सातत्याने पुढे जाऊ इच्छिणाऱ्या पालक व शिक्षकांच्या मार्गातील अडथळे दूर करणे हे ‘डेल’च्या ‘आरंभ’चे उद्दिष्ट आहे. या सहयोगामुळे ‘डेल आरंभ’ ‘टाटा क्लासएज’च्या समूहातील शाळांपर्यंत पोहोचू शकेल आणि ‘डेल आरंभ’च्या समूहातील शाळांना ‘टाटा क्लासएज’च्या ई-लर्निंग सोल्युशन्सचा लाभ करून घेता येईल. शाळेच्या मुख्याध्यापकांना धोरणात्मक विचार आणि नेतृत्वकौशल्यांचे प्रशिक्षण देणारा ‘टाटा क्लासएज’चा ‘प्रिन्सिपॉल लीडरशिप प्रोग्राम’ही सध्या ‘डेल आरंभ’च्या नेटवर्कमध्ये असलेल्या शाळांत राबवला जाणार आहे.

या सहयोगाबद्दल ‘टाटा क्लासएज’चे मुख्य व्यावसायिक अधिकारी संजय राधाकृष्णन म्हणाले, ‘तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग झाले आहे, अशा काळात शालेय शिक्षणही त्यास सुसंगत असले पाहिजे. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वर्गाच्या पलीकडे संवाद घडला पाहिजे. शिक्षणात तंत्रज्ञानाचा अंतर्भाव झाल्यास संवादात्मक अध्ययन साधनांच्या मदतीने शिक्षण प्रक्रियेचा कायापालट होईल आणि या अध्ययनाची निष्पत्तीही अधिक चांगली असेल. ‘डेल’शी सहयोग केल्यामुळे आम्हाला ‘डेल आरंभ’ शाळांपर्यंत पोहोचून आमची अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन आणि समाजाशी जोडून घेण्यासाठीची सर्वसमावेश सूचनाधारित सोल्युशन्स त्यांना देता येतील.’

डेल कंझ्युमर अॅंड स्मॉल बिझनेस इंडियाच्या मार्केटिंग संचालक रितू गुप्ता म्हणाल्या, ‘उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये घोडदौड करणाऱ्या नवभारतासाठी आपले शिक्षक आणि विद्यार्थी शिक्षणातील तंत्रज्ञानाचे दूत झाले पाहिजेत. भविष्यकाळातील मनुष्यबळाला शिक्षण देणाऱ्या शिक्षकांमध्ये आत्मविश्वास आणि क्षमता बांधणी करण्यासाठी ‘डेल आरंभ’ हा आमचा वायदा आहे. ‘टाटा क्लासएज’सोबत सहयोग हे या दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल असून, समान लक्ष्याच्या पूर्तीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. पर्सनल कॉम्प्युटर वापरण्याचे लाभ अद्याप बहुतेक भारतीयांना लक्षात आलेले नाहीत हे सत्य आहे. शिक्षणात तंत्रज्ञानाची संकल्पना अशा सहयोगांमुळे भक्कम होणार आहे हे महत्त्वाचे.’

‘टाटा क्लासएज’ची डिजिटल लर्निंग सोल्युशन्स आता भारतभरातील एक हजार ४०० शाळांमधील एक लाखांहून अधिक शिक्षक वापरत आहेत. ‘डेल आरंभ’चे हे दुसरे वर्ष असून, ७९ शहरांतील चार हजारांहून अधिक शाळांतील ७५ हजार शिक्षकांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. पीसीच्या वापराबाबत शिक्षकांना मूलभूत आणि अद्ययावत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग ते सहज अध्ययन-अध्यापनाच्या अनुभवात करू शकतात.

‘टाटा क्लासएज’विषयी :
वर्गातील अभ्यासक्रमावर आधारित उपक्रम आणि संवादात्मक तंत्रज्ञान यांचा प्रभावी मिलाफ साधून शिक्षकांना अधिक चांगल्या अध्यापनासाठी सक्षम करणारी कल्पक व सर्वसमावेशक सूचनाधारित सोल्यूशन ‘टाटा क्लासएज’ पुरवते. ‘टाटा क्लासएज’ने स्वत: विकसित केलेले सूचनाधारित मार्गदर्शन आणि मल्टिपल लर्निंग एक्स्पीरियन्सेस (एमएलईएक्स) प्रारूप विद्यार्थ्यांची सामाजिक, वैचारिक कौशल्ये वाढवणाऱ्या अनेकविध उपक्रमांचा वापर करते. यामध्ये महत्त्वपूर्ण विचार, सृजनशीलता, संघभावना, संशोधन प्रवृत्ती आणि संवाद कौशल्यांचा समावेश असतो. भारतभरातील एक लाखांहून अधिक शिक्षकांनी आधीच ‘टाटा क्लासएज’ची अध्यापन पद्धती स्वीकारली आहे.

‘डेल’विषयी :
पुरस्कारप्राप्त डेस्कटॉप्स, लॅपटॉप्स, टू-इन-वन्स आणि थिन क्लायंट्स (हलक्या वजनाचे कॉम्प्युटर्स), शक्तिशाली वर्कस्टेशन्स, विशिष्ट वातावरणासाठी तयार केलेली दणकट उपकरणे, मॉनिटर्स, एंडपॉइंट सुरक्षा सोल्युशन्स आणि सेवा यांसह ‘डेल’ आजच्या कार्यालयाला सुरक्षितपणे जोडणीसाठी, उत्पादनासाठी आणि कोठूनही कुठेही सहयोगासाठी जे आवश्यक आहे ते सगळे पुरवते. ‘डेल टेक्नोलॉजीज’चा भाग असलेले ‘डेल’ सर्व प्रकारच्या ग्राहकांना, संस्थांना १८० देशांत सेवा देत असून, उद्योगक्षेत्रातील सर्वाधिक सर्वसमावेशक आणि कल्पक अशी एंड-यूजर श्रेणी आहे.

‘डेल आरंभ’विषयी :
तंत्रज्ञानाची शक्ती वापरून अध्ययन अधिक प्रभावी करण्यासाठी विशेषरित्या विकसित केलेला ‘आरंभ’ हा भारतभरात उपलब्ध असलेला पीसी आहे. डिजिटल भारतात ठामपणे पाय रोवण्यास पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हा डिझाइन करण्यात आला आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना परस्परांशी जोडून त्यांना पीसीचा उपयोग घरी व शाळेत दोन्ही ठिकाणी अधिक चांगल्या अध्ययनासाठी करण्यास शिकवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link