Next
‘इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य निर्माण करावे’
सरहद महाविद्यालयात ‘इंग्लिश लिटररी क्लब’चे उद्घाटन
प्रेस रिलीज
Wednesday, October 24 | 01:34 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘जागतिकीकरणाच्या काळात इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांनी शब्दसंग्रह वाढवून, भाषिक कौशल्याचा विकास करून इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य निर्माण करावे,’ असे मत लोणावळा येथील डीपीएनपी कॉलेजच्या इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉ. सुपोर्णो मित्रा यांनी व्यक्त केले.

पुण्यातील सरहद महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे ‘इंग्लिश लिटररी क्लब’चे उद्घाटन डॉ. मित्रा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्या वेळी बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रार्चाय डॉ. हनुमंतराव जाधवर, उपप्रार्चाया डॉ. संगीता शिंदे उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य निर्माण होण्यासाठी डॉ. मित्रा यांनी इंग्रजी भाषेची प्रात्यक्षिके प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम घेतला. इंग्रजी विभागाचे प्रा. सोमेश्वर रेगुडे, प्रा. सोनाली शेळके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी सुतार या विद्यार्थिनीने केले. व समृद्धी गुरव हिने आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link