Next
‘केईएम’ला ‘ह्युमन मिल्क बँक’ची देणगी
प्रेस रिलीज
Friday, June 08, 2018 | 04:25 PM
15 0 0
Share this storyपुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे साउथतर्फे येथील केईएम हॉस्पिटलला ‘नेक्टर ह्युमन मिल्क बँक अँड लॅक्टेशन सर्व्हिसेस’ची देणगी दिली. ‘केईएम’चे वैद्यकीय संचालक डॉ. कुरूस कोयाजी, बालरोगचिकित्सा संचालक डॉ. आनंद पंडित, आणि रोटरी क्लब ऑफ पुणे साउथचे अध्यक्ष डॉ. किरण पुरोहित या वेळी उपस्थित होते.

या प्रसंगी ‘केईएम’चे बालरोगचिकित्सा संचालक डॉ. पंडित म्हणाले, ‘मातेचे दूध न मिळाल्यास नवजात अर्भकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. मातेचे दूध नवजात अर्भकाला सर्वोत्तम पोषण आणि आजार, संसर्गांपासून संरक्षण देते. या समस्येवर उपाय म्हणून दवाखान्यात ‘ह्युमन मिल्क बँक’ या संकल्पनेचा वापर केला जातो, जिथे ​​मातेचे दूध दात्यांकडून संकलित केले जाते आणि गरजू नवजात अर्भकांसाठी संरक्षित केले जाते. ‘केईएम’ येथील ‘नेक्टर’ ह्युमन मिल्क बँकमध्ये अत्याधुनिक ह्युमन मिल्क पाश्चरायझिंग मशीन ‘किमी’चा समावेश आहे. ज्यामुळे अशा मिल्क बँक्स स्थापन करण्याचा खर्च ५० लाखांवरून थेट दहा लाख इतका कमी येतो. यामुळे जवळजवळ प्रत्येक दवाखान्याला हे परवडण्यासारखे झाले आहे. असे जागतिक दर्जाचे उपकरण स्वीकारताना आम्हाला आनंद झाला आहे आणि यामुळे नवजात बालकांना सर्वोत्तम पोषण देणे शक्य होणार आहे.’

रोटरी क्लब ऑफ पुणे साउथचे अध्यक्ष डॉ. पुरोहित म्हणाले, ‘महिला व बाल आरोग्य हा ‘रोटरी’साठी एक महत्त्वाचा विषय आहे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे साउथ या बाबतीत अग्रेसर आहे. आमचे सदस्य, रोटेरियन सुधीर वाघमारे यांनी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि यापुढे हा प्रकल्प इतर चॅरिटी हॉस्पिटल्समध्ये देखील राबविला जाईल, ज्यामुळे कुठल्याही बालकाला सर्वोत्तम पोषणाचा स्रोत असलेल्या मातेच्या दुधापासून वंचित रहावे लागणार नाही.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link