Next
‘पोषणमुल्यांचे धडे देणे आवश्यक’
डॉ. यू. डी. चव्हाण यांचा सल्ला
प्रेस रिलीज
Wednesday, March 13, 2019 | 05:27 PM
15 0 0
Share this story

उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. यू. डी. चव्हाण.

पुणे : ‘बारीक होण्यासाठी उपाशी राहणे नव्हे, तर आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटकांची कमी होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या रोजच्या आहारातून पोषणमूल्य किती प्रमाणात शरीरात जात आहेत याविषयीची माहिती सर्वांना व्हायला हवी त्यासाठी पोषणमुल्यांचे धडे देणे आवश्यक आहे,’ असा सल्ला राहुरीमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. यू. डी. चव्हाण यांनी दिला.

स्कायरूट व्हेनचर्स एलएलपीने ‘निरोगी आरोग्यासाठी आवश्यक पौष्टिक आहार’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी ‘मानवी आरोग्यासाठी पोषक अन्नधान्य’ या विषयावर ते बोलत होते.  

या प्रसंगी स्कायरूट व्हेनचर्स एलएलपीचे विश्वस्त अजय कंग्राळकर, संचालिका जयश्री चौधरी, इंडियन डायटरी असोसिएशनच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा शिल्पा शिरोळे, अर्चना रायरीकर, तसेच अनेक न्यूट्रीशिनिस्ट आणि डायटिशियन्सही उपस्थित होते. या वेळी न्यूट्रीशियस पदार्थ वापरून त्यापासून वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ बनविण्याच्या स्पर्धेचेदेखील आयोजन केले होते.

सच हॉस्पिटॅलिटीच्या संचालिका कमलजित कौर म्हणाल्या, ‘चांगला पौष्टिक आहार प्रभावी औषधाप्रमाणेच असतो, शरीराचे कार्य नीट चालवायला त्याची मदत होते, तो योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत गेला नाही तर आपले आरोग्य बिघडते. यासाठी प्रक्रिया केलेले अन्न न खाता आपल्या मातीत उगवलेल्या पारंपारिक धान्यांचा समावेश आहारामध्ये करणे आवशयक आहे.’

सिनियर न्यूट्रिशनिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या अंबिका नायर म्हणाल्या, ‘धान्य मोड आणण्याच्या प्रक्रियेने त्यातील क्षार आणि प्रथिनांचे प्रमाण वाढते; तसेच जीवनसत्वे आणि इतर पोषकतत्वेही यामध्ये असतात. मोड आलेले कडधान्य पचण्यासही हलके होते. अशा कडधान्यांच्या सेवनाने शरीरामध्ये चरबी वाढत नाही. अन्य जीवनसत्वे व प्रथिने यामध्ये भरपूर मात्रेमध्ये असल्याने याचे सेवन डोळे, त्वचा, केस या सर्वांच्याच आरोग्यासाठी लाभकारी आहे. मोड आलेल्या कडधान्यांच्या सेवनाने शरीरातील कोलेस्टेरोलची मात्रा कमी होऊन धमन्यांमध्ये अडथळे दूर होतात याशिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link