Next
ताराचंद आयुर्वेदीय ट्रस्टच्या विश्वस्तपदी डॉ. गिरीश टिल्लू
प्रेस रिलीज
Tuesday, April 30, 2019 | 02:54 PM
15 0 0
Share this article:

प्रा. डॉ. गिरीश टिल्लूपुणे : ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदीय ट्रस्टच्या विश्वस्तपदी हेल्थ सायन्स विभागाचे प्रा. डॉ. गिरीश टिल्लू यांची नियुक्ती करण्यात आली आहे,’ अशी माहिती अध्यक्ष दत्ताजी गायकवाड यांनी दिली. 

विश्वस्त मंडळावर डॉ. राजेंद्र हुपरीकर, गोपाल राठी, महापौर मुक्ता टिळक, सुनील कांबळे यांची याआधीच नियुक्ती झाली आहे. सर्वसामान्यांसाठी शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदीय रुग्णालयामध्ये दर वर्षी अंदाजे ५५ हजारांहून अधिक पंचकर्म उपचार केले जातात. सर्व वैद्यकीय उपचार व सुविधा याठिकाणी अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत. या शिवाय प्रसुती तसेच गुंतागुतीच्या शस्त्रक्रियादेखील येथे तज्ज्ञ चिकित्सक हाताळतात. 

आयुर्वेद ही भारताला लाभलेली एक अमूल्य देणगी आहे आणि त्या माध्यमातून ही संस्था गेल्या ७० वर्षांपासून लोकांच्या सेवेत कार्यरत आहे. येथे रुग्णांना आवश्यक ती सेवा आणि योग्य आयुर्वेदिक उपचार पुरविले जातात. डायललीसिसची सेवा ४५० रुपये इतक्या माफक किंमतीत याठिकाणी उपलब्ध आहे. आर्थिक कारणास्तव कोणाला उपचारात कमतरता भासू नये, म्हणून अत्यल्प दरात ही सेवा अविरतपणे गरजूंना दिली जाते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search