Next
मोहिते महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन
मिलिंद जाधव
Saturday, February 02, 2019 | 12:59 PM
15 0 0
Share this article:



मोखाडा : तालुक्यातील कल्याण गिरीवासी सेवा मंडळ संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी कला, वाणिज्य व बीएमएस महाविद्यालय आणि मातोश्री यशोदाबाई मुरलीधर मोहिते कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा-जोगलवाडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त करिअर मार्गदर्शनाचे आयोजन केले. प्रारंभी गिरीवासी सेवा मंडळाचे मार्गदर्शक, सल्लागार सुधाकर मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.



तत्पूर्वी लेझीम पथकाच्या आणि ढोल-ताशांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये संविधानाच्या प्रतिमेचे व भारतमातेची प्रतिकृती तयार करून शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर आयोजित करिअर मार्गदर्शन वर्गात केंद्रीय उत्पादन शुल्काचे निवृत्त सहाय्यक आयुक्त सुहास पाटील, ठाणे येथील ज्योतिषी श्रीनिवास सावरगावकर, निवृत्त सहाय्यक निबंधक सुधाकर मोहिते यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीविषयी मार्गदर्शन केले.



‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेला न घाबरता त्या भाषेवर प्रभुत्व मिळवले पाहिजे, भारतीय प्रशासीय सेवेत रुजू होऊन ग्रामीण, आदिवासी भागाचे नाव उज्ज्वल करावे,’ असा सल्ला सुधाकर मोहिते यांनी दिला, तर  ‘विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून कठोर परिश्रमाने आपले अस्तित्व निर्माण करायला हवे,’ असे पाटील यांनी सांगितले.



ध्वजारोहणाप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, पोलीस दूरक्षेत्र, आरोग्य विभाग तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापकेत्तर वर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर गवंदे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search