Next
मेघास...
BOI
Wednesday, August 16, 2017 | 05:00 PM
15 0 0
Share this article:


दडी मारलेल्या पावसाला परत बोलावण्यासाठी कुसुमाग्रजांनी मेघांना केलेले आवाहन म्हणजे ‘मेघास’ ही कविता.‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कवितामध्ये आज पाहू या तीच कविता...
............
थांब थांब परतू नको रे घना कृपाळा,
अजुनि जाळतोच जगा तीव्र हा उन्हाळा!
अजुनि पायी भासतात पसरलेले निखारे
उसळतात अजुनि गगनि पेटलेले वारे
मरुनि पडतात तरुवरुनी पाखरे
तगमगुनी टाकितसे भूमि ही उसासे
शून्य हृदय होत नदी हसत विकट भासे
रखरखती दाही दिशा उफळतात ज्वाळा!
हतभागी दिसत तरू जाळत्या उन्हाने
पायाशी पडलेली गळुनि दग्ध पाने
आशा जणू पिचलेल्या लगटती जिवाला!
बांधावर बसुनि नजर बांधुनि आकाशी
तडफडती गाईगुरे पाहुनी उपाशी
शेतकरी बैसे कर लावुनी कपाळा!
गर्जत ये, ओढित ये आसूड तडितेचा
गर्वोन्नत माथा तो नमव भास्कराचा
लोकाग्रणि नमवी जसा मातल्या नृपाळा!
- कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search