Next
हिमायतनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
नागेश शिंदे
Tuesday, July 09, 2019 | 04:53 PM
15 0 0
Share this article:


हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील अनेक तरुणांनी आणि काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा कार्यक्रम नगरपंचायतीच्या प्रांगणात आठ जुलै २०१९ रोजी झाला.

हिमायतनगर शहरातील काँग्रेस पक्षाचे माजी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मन्नान भाई, युवानेते विपुल दंडेवाड, भारतीय जनता पक्षाचे राजेश जाधव, विठ्ठल पार्डिकर, भाजपचे  सोशल मीडिया प्रमुख नितीन मुधोळकर, मिराजभाई मसालेवाले, बाबूभाई नेहरूनगर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांच्या कामावर विश्वास ठेऊन नगराध्यक्ष राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.


या वेळी हदगाव येथील माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे, तालुका संघटक संजय काईतवाड, युवासेना तालुकाप्रमुख विशाल राठोड, शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार, जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन तुप्तेवार, डॉ. प्रसाद डोंगरगावकर, गजानन चायल, अरविंद पाटील सिरपल्लिकर, शंकर पाटील, बाळुअण्णा चवरे, राजेश जाधव, योगेश चिल्कावार, अमोल धुमाळे, गजानन हरडपकर, राम नरवाडे, बंडू अंनगुलवार, इद्रीस शेवाळकर, नितीन मुधोळकर, विठ्ठल पार्डिकर, सुनील चव्हाण, मंगेश धुमाळे, दुर्गेश मंडोजवार, निक्कू ठाकूर, शेख खुदुस शेवाळकर यांच्यासह असंख्य नवनिर्वाचित कार्यकर्ते, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search