Next
पुण्यात मतमोजणीच्या दिवशी वाहतूक नियमनाची तयारी पूर्ण
प्रेस रिलीज
Tuesday, May 21, 2019 | 12:17 PM
15 0 0
Share this article:


पुणे : पुणे जिल्ह्यामधील मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुलामध्ये २३ मे २०१९ रोजी होणार आहे. या दिवशीच्या वाहतूक नियमनाची तयारी पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे. त्याविषयी राजकीय पक्षांच्या उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, उप जिल्हाधिकारी संदीप निचित, पिंपरी-चिंचवड परिमंडल-दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक ( वाहतूक) किशोर म्हसवडे आदी अधिकारी उपस्थित होते.


या वेळी पोलीस प्रशासनाकडून राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या दिवसाची वाहतुकीविषयी माहिती देण्यात आली. कोणत्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना कोणत्या ठिकाणी आपली वाहने पार्क करता येईल याबाबतची माहिती देऊन मतमोजणीसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्वच अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या वाहनांना  ओळखपत्र पाहून मुख्य दरवाज्यातून सकाळी सात वाजेपर्यंतच प्रवेश दिला जाईल, असे या वेळी सांगण्यात आले. 

ओळखपत्राशिवाय आत सोडले जाणार नसून, एकदा आत सोडल्यानंतर बाहेर जाताना त्याचे ओळखपत्र जमा करण्यात आले, तर पुन्हा त्यांना आत सोडले जाणार नाही; तसेच मतमोजणी केंद्रात कोणालाही मोबाइल नेण्यास बंदी असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search