Next
‘ज्योतिषशास्त्राला कायद्याचे संरक्षण मिळावे’
ज्योतिष अभ्यासक डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी व्यक्त केली अपेक्षा
BOI
Wednesday, April 17, 2019 | 06:13 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘कोणतेच शास्त्र परिपूर्ण असू शकत नाही. त्याला ज्योतिषशास्त्रदेखील अपवाद नाही. अन्य शास्त्रांप्रमाणे ज्योतिषशास्त्रालादेखील शासनाकडून कायद्याचे संरक्षण मिळावे’,  अशी अपेक्षा ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी व्यक्त केली. 

‘इंटरनॅशनल अॅस्ट्रो फाउंडेशन’ आणि ‘महर्षी वेद व्यास अॅकॅडमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे येथे आयोजित केलेल्या ‘अखिल भारतीय ज्योतिर्विद संमेलना’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘अॅस्ट्रो इंटरनॅशनल फाऊंडेशन’चे अध्यक्ष भारत खंधोडिया यांनी प्रास्ताविक भाषणात, आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्योतिर्विदांचे संघटन करण्यामागील उद्देश स्पष्ट केले. ज्योतिषशास्त्रात अधिकाधिक प्रमाणात अचूकता येण्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्योतिर्विदांना पूर्ण सहकार्य करण्यासाठी व्यापक व्यासपीठ उभारले असल्याचे त्यांनी सांगितले. 

या प्रसंगी ज्येष्ठ रमलज्ञ चंद्रकांत शेवाळे, अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे माजी अध्यक्ष व. दा. भट आदि मान्यवरांचीही भाषणे झाली. पं. दीपक शर्मा व अश्विनी भणगे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन कार्तिक रावल यांनी केले. 

‘भविष्य विचारण्यास येणाऱ्या व्यक्तीला भविष्य कथन करताना कोणत्या शब्दांत करावे, कोणत्या शब्दांत करू नये, याचे भान ज्योतिष्यांनी ठेवलेच पाहिजे. भविष्य कथानातील अचूकता वाढविण्यासाठी प्रत्येक ज्योतिष्याने फलज्योतिष - हस्तसामुद्रिक -अंकज्योतिष रमल - अध्यात्माची सांगड घालण्यासाठी आपला व्यासंग अधिक वाढवावा’, असे सांगून डॉ घाणेकर पुढे म्हणाले, ‘वर्तवलेले भविष्य किती बरोबर येते यापेक्षाही ज्योतिषी समाजाची सुख - दु:खे जाणून घेऊन दिलासा देण्याचे कार्य अधिक मोलाचे असते.’ ज्योतिषशास्त्रातील मर्यादांवरील पर्यायांविषयक मार्गदर्शन करताना डॉ. मधुसूदन घाणेकर म्हणाले, ‘आयुष्यात जेव्हा काही ग्रह आडवे येतात, तेव्हा इच्छाशक्ती प्रबळ केल्यास निश्चित प्रतिकूलतेवर मात करता येते. ज्योतिषांनी समाजाचे मनोबल, मनोधैर्य उंचावण्यासाठी आपले योगदान वाढवण्यासाठी गरज आहे.’ 

या वेळी ‘अॅस्ट्रो इंटरनॅशनल’च्या विविध पातळ्यांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून भरत खंधोडिया, चंद्रकांत शेवाळे यांच्या हस्ते संपूर्ण देशभरातून आलेल्या मान्यवर ज्योतिर्विदांचा जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राच्या सल्लागारपदी चंद्रकांत शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली. ‘अॅस्ट्रो इंटरनॅशनल फाउंडेशन’च्या उत्कर्षासाठी महाराष्ट्रातील सर्व ज्योतिर्विद पूर्णपणे सहकार्य करतील अशी ग्वाही शेवाळे यांनी दिली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search