Next
कुंभमेळ्याचा अभ्यासू पद्धतीने वेध घेणारी मालिका
‘सोनी बीबीसी अर्थ’वर प्रसारित होणार ‘कुंभ मेला कार्निव्हल ऑफ स्पिरिच्युअॅलिटी’
BOI
Friday, February 15, 2019 | 06:50 PM
15 0 0
Share this article:


भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली संस्कृती आहे. हिंदू संस्कृतीचे प्रातिनिधिक रूप दर्शवणारा आणि भारतातला सर्वांत मोठा समजला जाणारा धार्मिक उत्सव म्हणजे ‘कुंभमेळा’. या कुंभमेळ्यासाठी देशभरातूनच नाही, तर अन्य काही देशांमधूनही अनेक भाविक येतात. या भाविकांचे या कुंभमेळ्यादरम्यान असलेले अनुभव विशद करणारी एक विशेष मालिका ‘सोनी बीबीसी अर्थ’ ही वाहिनी घेऊन येत आहे. 

दर रविवारी सोनी बीबीसी अर्थ या वाहिनीवर कुंभमेळ्याचा अभ्यासू पद्धतीने वेध घेणारी ‘कुंभ मेला कार्निव्हल ऑफ स्पिरिच्युअॅलिटी’ ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. भारतीय संस्कृतीचे आकर्षण केवळ भारतीयांनाच नाही, तर परदेशी पर्यटकांनाही नेहमीच असल्याचे दिसले आहे. अनेक पर्यटक आपल्या संस्कृतीवर, इथल्या परंपरांवर संशोधन करतानाही दिसतात. असे असताना कुंभमेळ्यासारख्या देशातील सर्वांत मोठ्या धार्मिक उत्सवाने परदेशी पर्यटकांना भूरळ न घातली तर नवलच. 

भारतीय संस्कृतीत नदीला पवित्र आणि पूजनीय मानले जाते. याच नदीच्या तीरावर या कुंभमेळ्याच्या उत्सवाचे आयोजन केले जाते. भारतीय संस्कृती आणि धर्म यांचा अनोखा मिलाफ या मेळ्यात पाहावयास मिळतो. भारतीय संस्कृतीवर संशोधन करणारे पर्यटक या कुंभमेळ्याच्या उत्सवाकडे एक खूप मोठा आणि महत्त्वाचा उत्सव म्हणून पाहतात. अलिकडील काळात युक्रेनमधील नागरिकही या कुंभमेळ्यात सहभागी होताना दिसतात. 

उत्सवकाळात याठिकाणी होणाऱ्या विविध वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे हा उत्सव संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. कुंभमेळ्यादरम्यान याठिकाणी वास्तव्य करणारे भारतीय तसेच परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात विविध अनुभवांचे भांडार घेऊन इथून बाहेर पडतात. त्यांचे हे अनुभव, उत्सवाला येण्यामागची कारणे, प्रेरणा, मिळणारा आनंद, समाधान या सर्व बाबींवर आधारित ही मालिका असणार आहे. 

(कुंभमेळ्याविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search