Next
‘आगरवाट’चा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम उत्साहात
मिलिंद जाधव
Tuesday, March 05, 2019 | 03:28 PM
15 0 0
Share this storyभांडुप : आगरी बोलीभाषा आणि आगरी संस्कृती जपणाऱ्या आणि तिचा गोडवा सातासमुद्रापार नेण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या ‘आगरवाट’ या काव्यमैफलीच्या २५व्या प्रयोगानिमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम भांडुप येथील श्रीराम कॉलेजच्या सभागृहात झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे यांनी भूषविले. या प्रसंगी पल्लवी पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) जनसंपर्क प्रमुख एल. बी पाटील, मुंबई विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ सदस्य नितीन आरेकर, कवी, बोलीभाषा तज्ज्ञ डॉ. अनिल रत्नाकर, अभिनेता मयुरेश कोटकर, गुलाबराव वझे, रवीशेठ पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक करताना संदेश भोईर म्हणाले, ‘‘आगरवाट’ या कार्यक्रमातून आम्ही नेहमीच आगरी भाषेचा गोडवा कवितेच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने काम करीत असतो. यापुढेही दर्जेदार कविता लिहून आम्ही आगरी भाषा जपण्यासाठी काम करू.’

आगरी कोळी लोकसंगीतात ज्यांनी योगदान दिलेले दत्ता पाटील, अनंत पाटील यांच्या कुटुंबाला, तसेच एकनाथ माळी, सदानंद पाटील, शंकर पाटील, बाबुलनाथ नाईक, यशवंत ठाकूर, शनीकुणार, अरुण जांगले, रमेश नाखवा, अर्जुन पाटील, रामदास पाटील यांना या प्रसंगी सन्मानित करण्यात आले. लोमहर्ष भगत, सुजित पाटील, शिवराज या कलाकारांनी ‘क्षितीज दी बँड’चे सादरीकरण केले. श्याम माळी यांनी लिहलेल्या ‘आमचा आगरी दादूस’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक म्हात्रे म्हणाले, ‘रक्ताच्या मायेची माणसे आगरी समाजात आहेत. तुमचे मराठी उत्तम आहे त्यांचीच आगरी भाषा ऐकतात. आता सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. तेव्हाच खरी शक्ती निर्माण होईल. आगरी भाषा ही सर्वांना आपलीशी करणारी भाषा आहे.’ या प्रसंगी म्हात्रे यांनी दर्जेदार कविता सादर केली.

‘ज्या, ज्या समाजात जे काही चांगल आहे ते घ्या,’ असे गुलाबराव वझे यांनी सांगितले. आगरी भाषेच्या संवर्धनासाठी काम केलेल्यांच्या पाठीवर एल. बी. पाटील यांनी शाबासकीची थाप दिली.

ज्या विविध संस्थानी दर्जेदार कविता रसिकांपर्यंत पोहोचविल्या त्या ‘मुक्काम पोस्ट कविता’, ‘पार्कातील कविता’, शब्दांगण प्रस्तुत ‘संवाद शब्दांचा शब्दांशी’, ‘आगरायन’, कोलाज निर्मित ‘क’ ध्यास कवितेचा काव्यमंच मुंबई, शिवानी साहित्यिक मंच मुंबई यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. कवी रामनाथ म्हात्रे, संदेश भोईर, श्याम माळी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन अरुण अहिरे यांनी केले.

(‘बोलू बोलीचे बोल’ या ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link