Next
दीड-दमडी
BOI
Friday, October 05, 2018 | 10:05 AM
15 0 0
Share this story

चालू घडामोडींतील एखाद्या चर्चेतील विषयावर तिरकस बाण मारलेले लेखन वाचकप्रिय होते. तंबी दुराई म्हणजेच श्रीकांत बोजेवार यांनी असे लेखन वृत्तपत्रातील सदरातून केले. त्यातील निवडक लेख ‘दीड-दमडी’ या पुस्तकाच्या दोन संचांतून वाचायला मिळतात. यातील ‘राजकीय’ या संचात कोळसा गैरव्यवहारात यूपीए सरकारवर ‘कॅग’चे तत्कालीन प्रमुख विनोद राय यांनी ठेवलेला ठपका, दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतरच्या लोकभावना, देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची घोषणा भाजपने प्रथम केली ती घटना, नरेंद्र मोदी यांच्यावर दंगल पेटविण्याचे झालेले आरोप, लोकप्रतिनिधींना शिक्षा होऊ नये म्हणून आणलेल्या विधेयकाचे वर्णन राहुल गांधी यांनी ‘नॉनसेन्स’ असे केले तो प्रसंग, अशा राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकारणातील घटनांशी संबंधित ३८ लेख आहेत. ‘अ-राजकीय’ संचामध्ये ‘आदर्श’प्रकरणी राज्याच्या तीन माजी मंत्र्यांवर झालेले आरोप, ‘गॉड पार्टिकल’चा (देव कण) शोध आणि राजकीय स्थिती, अडवाणी यांच्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तव्य, जयंत साळगावकर यांचे निधन व नरेंद्र दाभोलकर यांची हत्या या घटना एकाच दिवशी घडल्या, त्या दोघांच्या मृत्युपश्चात झालेल्या काल्पनिक भेटीचे वर्णन असे ४२ लेख आहेत.

पुस्तक : दीड-दमडी (राजकीय, अ-राजकीय)
लेखक : तंबी दुराई
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पृष्ठे : ३२३
मूल्य : ३५० रुपये

(‘दीड-दमडी’च्या दोन पुस्तकांचा संच ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link