Next
ई-मोबिलिटी प्रसारासाठी ‘टाटा पॉवर’ आणि ‘टाटा मोटर्स’ची भागीदारी
प्रेस रिलीज
Thursday, May 31 | 05:54 PM
15 0 0
Share this story

नवीन विद्युत वाहन चार्जिंग स्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी ‘टाटा पॉवर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्र‌वीर सिन्हा

मुंबई : भारतात वीजनिर्मिती क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या टाटा पॉवर कंपनीने मुंबई महानगर वीजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी पूरक करण्यासाठी; तसेच महाराष्ट्रात वीजधारक चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी टाटा मोटर्सबरोबर भागीदारी केली आहे. महाराष्ट्र राज्यात विद्युत वाहने चालविण्यासाठी राज्य सरकारतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेइकल पॉलिसी’वर या दोन्ही कंपन्या स्वाक्षऱ्या करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन विद्युत वाहन चार्जिंग स्थानकांचे उद्घाटन करून, जागतिक पर्यावरण दिन सप्ताहाचा प्रारंभ केला. माटुंगा, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, भांडुप (एलबीएस मार्गाजवळ), चेंबूर, मालाड (लिंक रोडजवळ) आणि कार्नक बंदर (फोर्ट आणि फ्रीवे जवळ) या ठिकाणी ही नऊ विद्युत वाहन चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार आहेत.

‘टाटा पॉवर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्र‌वीर सिन्हा म्हणाले, ‘मुंबई महानगराला वीजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी तयार करण्यासाठी; तसेच हरित महाराष्ट्राच्या राज्य सरकारच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ‘टाटा मोटर्स’च्या सहकार्याने ग्राहकांना चांगले भविष्य दाखविण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत.  मुंबईत विविध ठिकाणी विद्युत चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार असून चांगल्या महाराष्ट्राचे चित्र आम्हाला निर्माण करावयाचे आहे. अशाप्रकारच्या उभारणीमुळे तंत्रज्ञानावर आधारीत सेवा पुरवित, मुंबईकर ग्राहकांना पर्यावरणपूरक सेवा देण्याचे काम ‘टाटा पॉवर’तर्फे सुरू राहणार आहे.’

सामंजस्य उपक्रमावर स्वाक्षरी केल्याबद्दल टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, गुंटर बट्सेक  म्हणाले, ‘भारतात ई- मोबिलिटी प्रस्थापित करण्याच्या सरकारच्या स्वप्नाशी टाटा मोटर्स बांधील आहे. महाराष्ट्र सरकारबरोबर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटण्यास आम्ही उत्सुक आहोत. ईव्ही यंत्रणा प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक सामर्थ्य आमच्या समूह कंपन्यांमध्ये आहे. आमच्याकडे प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांचा तयार ईव्ही पोर्टफोलिओ असून त्याच्या बळावर  पर्यावरण संरक्षणाची बांधिलकी जपत भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.’

मुंबईत नऊ विद्युत वाहन चार्जिंग स्थानके उभारून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जाणार आहे. हरित भविष्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशाला एक चांगला उपाय सुचविण्याची ‘टाटा पॉवर’ची ही योजना आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link