Next
ईशान मेनसे ऑलिंपियाड स्पर्धेमध्ये भारतात पाचवा
प्रेस रिलीज
Friday, July 06, 2018 | 11:20 AM
15 0 0
Share this story

सातारा : फलटण-जाधववाडी येथील नामांकित आयडियल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी ईशान अमित मेनसे याने कॉनक्वेस्ट आयक्यू ऑलिंपियाड स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतामधून पाचवा क्रमांक पटकावला.

आयडियल इंटरनॅशनल ही स्थापनेपासूनच विद्यार्थी आणि पालकांच्या प्रथम पसंतीची म्हणून नावारूपाला आलेली शाळा आहे. क्विझ काँटेस्ट, वैदिक गणित, क्रिटीकल थिंकिंग, ऑपेरा रीडिंग, पॉझिटिव्ह कट्टा यांसारखे मुलांच्या क्षमतांचा कस लावणारे विविध उपक्रम येथे राबविले जातात. त्यामुळेच येथील विद्यार्थी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव झळकवत आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्या आवडीनुसार त्यांना बौद्धिक, शारीरिक खेळ पुरवणे, त्यांची अभ्यासातील क्षमता ओळखून त्यांना त्यानुसार तयार करणे, त्यांच्या सामाजिक गुणांना योग्य मार्गदर्शन करणे यांसारख्या मुल्यवर्धक पद्धतींचा अवलंब केला जातो. ‘आयडियल’मध्ये विविध स्पर्धा परीक्षेची तयारी वेगळ्या धर्तीवर घेतली जाते; तसेच स्पर्धेतील विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल, अवांतर वाचन या सुविधा पुरवल्या जातात.

विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेसाठी ध्यान, योगा, मेडीटेशन या पद्धती अवलंबल्या जातात. विद्यार्थ्यांना सर्वंकष ज्ञानामृत मिळावे यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या मार्गदर्शिका गीता पंजाबी मैडम यांच्यामार्फत शिक्षकांना वेळोवेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण हे दिले जाते. व्यवसायनिष्ठ उपक्रम, मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास, कार्यशाळा आदी उपक्रम ही त्यांना दिले जाते. या सर्वांचा उपयोग एक प्रगतीशील, संस्कारीत विद्यार्थ्यांची पिढी घडवण्यासाठी केला जातो.

ईशान मेनसे हा विदयार्थी आयडियल किड्समध्ये नर्सरीपासून शिक्षण घेत आहे. त्याने मिळवलेल्या यशात त्याचे आईवडिल, मार्गदर्शक शिक्षक सोफिया तांबोळी, संस्थेच्या अध्यक्षा वैशाली शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. ईशानच्या या अतुलनीय यशामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vaishalii Shinde About 223 Days ago
Thank you so much Bytes of India.
0
0

Select Language
Share Link