Next
कीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास
दोन ते सहा जानेवारी २०१९ या कालावधीत ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवांचे कीर्तन
BOI
Monday, December 03, 2018 | 04:28 PM
15 1 0
Share this article:

रत्नागिरी : गेली सात वर्षे रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळालेल्या कीर्तनसंध्या उपक्रमाच्या यंदाच्या पर्वात १९२० ते १९४७ या कालखंडातील स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास उलगडला जाणार आहे. राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवा यांच्या ओघवत्या वाणीतून विविध क्रांतिकारकांच्या कथांसह महाराष्ट्रातील संतपंचकाचे कार्यही ऐकता येणार आहे. दोन ते सहा जानेवारी २०१९ या कालावधीत रत्नागिरीत हा कीर्तन महोत्सव होणार आहे. 

शहरातील आठवडा बाजार येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात दररोज सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून कीर्तनाला सुरुवात होणार असल्याची माहिती कीर्तनसंध्या परिवारातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष अवधूत जोशी, नितीन नाफड, रत्नाकर जोशी, मकरंद करंदीकर, महेंद्र दांडेकर, गुरुप्रसाद जोशी, गौरांग आगाशे, योगेश हळबे आदी उपस्थित होते. 

कीर्तनसंध्या हा महाराष्ट्रात नावाजला गेलेला हा कीर्तन महोत्सव मनामनात राष्ट्रभक्ती जागवणारा रत्नागिरीचा मोठा प्रतिवार्षिक कार्यक्रम आहे. गर्दीचे उच्चांक गाठणाऱ्या या महोत्सवात यंदा अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळणार आहेत. यंदा श्रोत्यांना हा कार्यक्रम अर्धा तास जास्त अनुभवायला मिळणार आहे. सायंकाळी सहाऐवजी साडेपाच वाजता सुरुवात होणार आहे. दर वर्षीप्रमाणे ३२ फूट बाय २० फुटांचा भव्यदिव्य रंगमंच असेल आणि श्रोत्यांसाठी एसटी गाडीची सुविधाही मिळणार आहे. रंगमंचाच्या बाजूला दोन स्क्रीनसुद्धा लावले जाणार आहेत. भारतीय बैठकव्यवस्था आणि खुर्चीवर बसण्याची सुविधा, तसेच दुचाकी, चारचाकींसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्थाही आहे.

आफळेबुवा दर दिवशी पूर्वरंगामध्ये महाराष्ट्रातील संतपंचक म्हणजेच संत ज्ञानेश्वसर, संत तुकाराम, संत रामदास स्वामी, संत एकनाथ आणि संत नामदेव यांची जीवनगाथा उलगडणार आहेत. संपूर्ण भारतभर क्रांती घडवून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांची माहिती, त्यांचे ऐतिहासिक संदर्भ, कथा उत्तररंगामध्ये ऐकायला मिळणार आहेत. यामध्ये क्रांतिकारक हरनामसिंग, गणेशपंत सावरकर, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना, लाला लजपतराय आणि अनेक क्रांतिकारकांच्या कथा जाणून घेता येणार आहेत. तसेच दुसरे महायुद्ध व भारतीय स्वातंत्र्याच्या काही गोष्टीसुद्धा बुवा सांगणार आहेत. त्या अनुषंगाने काही गीतेही शेवटच्या टप्प्यात स्क्रीनवर पाहायला मिळतील.
गेल्या सात वर्षांत कीर्तनसंध्या उपक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, पेशवाईतील मराठेशाहीची देशव्यापी झुंज, स्वराज्याकडून साम्राज्याकडे, १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध आणि १८५७ ते १९२० या कालखंडातील इतिहास कीर्तनाद्वारे मांडला गेला आहे. 

महोत्सवात बुवांना हेरंब जोगळेकर (तबला), मधुसूदन लेले (हार्मोनियम), प्रथमेश तारळकर (पखवाज) यांची संगीतसाथ लाभणार आहे. निबंध कानिटकर निवेदन करणार आहेत. सुप्रसिद्ध एस. कुमार साऊंड सर्व्हिसचे उदयराज सावंत ध्वनिव्यवस्था करणार असून, बैठक व्यवस्था ओम साई डेकोरेटर्सतर्फे केली जाणार आहे.

बुवांच्या हस्ते बक्षिसाची संधी
यंदा प्रथमच श्रोत्यांना पाचही दिवशी काही प्रश्न कागदावर लिहून दिले जातील. हे प्रश्न बहुपर्यायी स्वरूपातील असून, त्यांची उत्तरे कार्यक्रम संपण्यापूर्वी एकत्र केली जातील. दररोज एका भाग्यवान विजेत्याला आफळेबुवांच्या हस्ते बक्षीस दिले जाणार आहे. या निमित्ताने बच्चेकंपनीला रंगमंचावर बुवांच्या हस्ते बक्षीस जिंकण्याची संधी आहे.

स्वयंसेवकांना आवाहन
कीर्तनसंध्या महोत्सवात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी आहे. गेल्या सात वर्षांत कीर्तनसंध्या परिवारामध्ये युवकांची मोठी फळी उभी राहिली आहे. स्वयंसेवक म्हणून नव्याने सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अवधूत जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

महोत्सवाच्या देणगी सन्मानिका १५ डिसेंबरनंतर खालील ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
मानस जनरल स्टोअर्स, माळनाका – ९०११६ ६२२२०
गुरुकृपा रेडिओ हाउस, टिळक आळी – ९८९०८ २७००६
धन्वंतरी आयुर्वेद, मारुती मंदिर – ९४२३२ ९२४३७
करंदीकर हॉटेल, शिवाजीनगर – ९४२३० ४७०४७
डिक्सन सप्लायर्स, जिल्हा परिषद रोड, माळनाका – ९४२२० ५२६१३
केळकर उपाहारगृह, मारुती मंदिर 

(गेल्या वर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवाची झलक दर्शविणारे काही व्हिडिओ सोबत देत आहोत. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी BytesofIndiaच्या यू-ट्यूब चॅनेलला भेट द्यावी. त्यासाठी येथे क्लिक करा.)


 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhye About 151 Days ago
It gives rise to emotions --not. Cold logic. Emotions do not lead to realistic Planning.
0
0

Select Language
Share Link
 
Search