Next
अमिताभ बच्चन म्हणतात, ‘जास्त हिंदी बोला’
BOI
Saturday, September 01 | 02:45 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनासाठीही लोकप्रिय आहे. अत्यंत अस्खलित अचूक हिंदी भाषेत ते हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकांशी आणि प्रेक्षकांशी संवाद साधतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते हिंदीचा आवर्जून प्रसार करतात. जास्तीत जास्त हिंदीत बोलावे यासाठी ते उपस्थित स्पर्धक, प्रेक्षकांना प्रोत्साहन देतात. नवीन पिढीत हिंदी भाषेचा वापर कमी असून, पाश्चात्त्य भाषेचा वापर अधिक होत असल्याबद्दल ते म्हणाले, मी या निरीक्षणाशी सहमत आहे. ‘केबीसी’च्या बाबतीत, मी कोणावरही दबाव आणत नाही, परंतु या कार्यक्रमाची भाषा हिंदी आहे आणि म्हणून मी हिंदीत बोलतो. यामुळे तरुण पिढीला हिंदीमध्ये बोलण्यास प्रेरणा मिळत असेल तर ते चांगलेच आहे. सर्वांनी जास्तीत जास्त हिंदी भाषेत बोलले पाहिजे.’ 
 
ते पुढे म्हणाले, ‘आजकाल, जेव्हा मला रोमन हिंदीमध्ये लिहिलेली स्क्रिप्ट मिळते, तेव्हा मी ते परत करतो आणि ते देवनागरी लिपीत लिहिण्याची विनंती करतो.’

घरात प्रामुख्याने हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये बोलत असल्याचे सांगून, बिग बी म्हणाले, ‘आमच्या कुटुंबातील काही सदस्य उत्तर भारतातील आहेत, काही दक्षिण भूमीतील तर काही पश्चिम बंगालमधील आहेत. त्यामुळे आम्ही हिंदी, पंजाबी, बंगाली भाषेतही बोलतो. दुसऱ्या कोणत्याही भाषेचा आमच्या घरात आदरच केला जातो.’

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाचे दहावे पर्व सोमवारी, तीन सप्टेंबरपासून सुरू होत आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. 


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link