Next
‘महिंद्रा’तर्फे ठाण्यात दुसऱ्या जल प्रकल्पाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, October 30, 2018 | 02:03 PM
15 0 0
Share this story

मुंबई : महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून शहापूरनजीकच्या टेंभा गावातील जांभूळपाडा येथे दुसरा जल प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून, या तालुक्यात उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई असते. ही स्थिती बदलण्यासाठी महिंद्रा लॉजिस्टिक्सने टेंभा दत्तक घेतले आहे. या गावात ‘महिंद्रा’मार्फत पायाभूत सुविधा विकास, शिक्षण, आरोग्य व व्यावसायिक मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवले जातात.

या वर्षी सुरुवातीला कंपनीने पाणीपुरवठा व्यवस्था स्थानिक पंचायतीच्या ताब्यात दिली. या उपक्रमाचा लाभ ७५ कुटुंबांना झाला असून, त्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. ठाकूरपाडा जल प्रकल्पाचा विस्तार म्हणून आता जांभुळपाड्याला पाइपद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

याबाबत बोलताना महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिरोजशा सरकारी म्हणाले, ‘महिंद्रा लॉजिस्टिक्समध्ये, चांगले काम करण्यावर कटाक्षाने भर देतो. हा प्रकल्प म्हणजे याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. आम्ही मानवतावादी, पर्यावरणविषयक व शैक्षणिक उपक्रमांद्वारे गावकऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल आणण्याचा प्रयत्न करत आहोत.’

टेंभा गावच्या सरपंच रेशम आंबळे म्हणाल्या, ‘आमच्या गावातील सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आम्हाला मदत करत असल्याबद्दल आम्ही महिंद्रा लॉजिस्टिक्सचे ऋणी आहोत. आम्हाला पाणी आणण्यासाठी तीन किलोमीटर जावे लागत होते. या जल प्रकल्पामुळे आम्हाला निश्चित फायदा होईल. आगामी वर्षांतही आम्हाला असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link