Next
विशेष मुले, बालरुग्ण आणि दिव्यांगांसाठी ख्रिसमस पार्टी
प्रेस रिलीज
Wednesday, December 19, 2018 | 04:42 PM
15 0 0
Share this article:



पुणे : खेळ, संगीत, खाऊ आणि सांताक्लॉजने दिलेल्या गिफ्टस् अशा वातावरणाचा विशेष मुले, बालरुग्ण आणि दिव्यांगांनी आनंद लुटला. निमित्त होते रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलतर्फे आयोजित केलेल्या ‘ख्रिसमस पार्टी’चे.

कॅम्पमधील दी लेडीज क्लब येथे ही ‘पार्टी’ १८ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी रंगली. हे या उपक्रमाचे १५वे वर्ष होते. विविध हॉस्पिटल्समधील असाध्य विकारांनी पीडित लहान मुले, मूकबधिर शाळांतील विद्यार्थी, दिव्यांग, मनोरुग्ण, तसेच अनाथगृहातील एकूण २५० मुले या पार्टीत सहभागी झाली. नवक्षितीज, एकलव्य फाउंडेशनमधील मुलांचाही यात समावेश होता.



रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलचे अध्यक्ष रवी कपूर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा आशा नायक, अनिल बोरा यांनी स्वागत केले. या कार्यक्रमासाठी दी लेडीज क्लब आणि सतीश शेट्टी यांचे सहकार्य लाभले.

(Please click here to read this news in English.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search