Next
‘जवानांना आत्मबळ, आत्मसन्मानाची गरज’
प्रेस रिलीज
Monday, October 30 | 05:46 PM
15 0 0
Share this story

शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा कृतज्ञता ​सोहळ्यात सन्मान करताना पालकमंत्री गिरीष बापट​. शेजारी योगेश गोगावले, नगरसेविका सुलोचना कोंढरे आणि तेजेंद्र कोंढरे.पुणे : ‘देशवासियांकडून मिळणारे आत्मबळ आणि आत्मसन्मान याची खरी गरज सीमेवरील जवानांना असते, सैनिकांच्या कर्तृत्त्वाला सलाम करण्यासाठी या उपक्रमासारखे व्यासपीठ ​वारंवार ​मिळणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

सीमेवर लढताना हौतात्म्य पत्करणार्‍या ४० सैनिकांच्या कुटुंबीयांच्या सन्मान सोहळा प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपच्या नगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे आणि भवानी पेठ येथील जय महाराष्ट्र तरुण मंडळ यांच्यातर्फे आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

बापट म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली दिवाळी सैनिक जवानांबरोबर साजरी केली. त्याप्रमाणे भाजप कार्यकर्ते तेजेंद्र कोंढरे देखील अशा प्रकारचा उपक्रम राबवून शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आधार आणि सन्मान देण्याचे स्तुत्य कार्य करीत आहेत.’

या प्रसंगी भाजपचे शहरप्रमुख योगेश गोगावले, कर्नल संभाजी पाटील आणि समाजसेविका स्वाती चिकलकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कसबा मतदारसंघाचे चिटणीस आणि जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कृतज्ञता सन्मान आणि दिवाळी कार्यक्रम रविवारी भवानी पेठ, पालखी विठोबा चौक येथे सायंकाळी उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश गोगावले होते. यावेळी कर्नल संभाजी पाटील, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, कसबा सरचिटणीस प्रमोद कोंढरे, कसबा मतदारसंघाचे सरचिटणीस छगन बुखाले, नगरसेवक राजेश येनपुरे, नगरसेविका आरती कोंढरे, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मनिषा लडकत, अशोक येनपुरे, कसबा महिला आघाडी अध्यक्ष वैशाली नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष होते. नगरसेविका सुलोचना कोंढरे आयोजित उपक्रमात सीमेवर लढणार्‍या सैनिकांच्या कुटुंबीयांचा आणि सीमेंतर्गत चांगली कामगिरी बजावणार्‍या सैनिकांचा सन्मान करणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता. राजू परदेशी, सागर शिंदे, पप्पूशेठ कोठारी, संजय देशमुख, राहूल कोंढरे आदी कार्यकत्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link