Next
मराठवाडा साहित्य संमेलनाचे डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन
BOI
Monday, December 24, 2018 | 04:36 PM
15 0 0
Share this article:

उदगीर : मराठवाडा साहित्य परिषदेच्या उदगीर शाखेतर्फे आयोजित चाळिसाव्या तीन दिवसीय मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन साहित्यिक डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी (ता. २३) झाले. या वेळी मराठवाड्यातील साहित्य-संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘सुंबरान’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.


‘आपल्या आजूबाजूचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण चिंतीत करणारे आहे. अनेक समाजसमूहाला असुरक्षित का वाटत आहे, याचा नीट विचार झाला पाहिजे’, असे मत संमेलनाचे अध्यक्ष डॉ. हृषिकेश कांबळे यांनी व्यक्त केले. 

‘सीमावर्ती भागात ६६ वर्षानंतर हे संमेलन होत असून, ते  सांस्कृतिक आणि भाषिकदृष्ट्या मराठी भाषिकांना जोडणारे आहे, असे मत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केले. या संमेलनात दोन कविसंमेलनात १०० कवी सहभागी होणार असून, विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. कवी संमेलनात पुण्यातील अंजली कुलकर्णी यांच्यासह अनेक कवी सहभागी झाले आहेत. 

 ‘मराठवाड्याचे काव्यवैभव’ हा प्रा. राजेश सरकटे यांचा कार्यक्रम, ‘उदगीरचे कलावैभव’ हा स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि अटलजींच्या कवितांचे वाचन आदी कार्यक्रम होणार असून, साहित्य संमेलनात बाबू बिरादार, प्रसाद कुमठेकर, ज्ञानेश महाराव, सरोज देशपांडे, अतुल देऊळगावकर, प्रवीण बांदेकर, महेंद्र कदम आदी ख्यातनाम साहित्यिक सहभागी होणार आहेत. कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत समारोप होईल. 

स्वतंत्र शिक्षक शाखा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून, यात शिक्षक कथाकथन, बालकुमार मेळावा, परिसंवाद, कविसंमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 58 Days ago
Best wishes to this and similar events . Does Maharashtra Sanitya Parishad help such events , in any fashion ?
0
0

Select Language
Share Link
 
Search