Next
‘दगड हे पृथ्वीच्या उत्क्रांतीचे साक्षीदार’
‘माणसाने केलेला दगडाचा वापर’ प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Friday, October 12, 2018 | 05:22 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘दगड हे पृथ्वीच्या उत्क्रांतीचे साक्षीदार आणि माहितीचे साठे असल्याने दगडांचा अभ्यास करणे म्हणजे पृथ्वीची, उत्क्रांतीची माहिती मिळवणे होय,’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी केले.

जीविधा, डेक्कन कॉलेज व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माणसाने केलेला दगडाचा वापर’ या विषयावरील प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (ता. ११) सायंकाळी झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हे प्रदर्शन ११ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते रात्री आठ या वेळेत राजा रविवर्मा कलादालनात आयोजित केले आहे.

डॉ. करमाळकर म्हणाले, ‘दगडांचा इतिहास लाखो, करोडो वर्षांचा आहे. पृथ्वीच्या उदरात काय दडले आहे, याचा अंदाज दगडांच्या अभ्यासातून करता येतो. दगडात सौंदर्य आहे आणि माहितीही आहे. हिरे हे अलंकारात वापरले जात असले, तरी पृथ्वीच्या खोल उदरातील माहिती त्यात लपलेली असते. या सर्व अभ्यासासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. यात पुणे विद्यापीठ जीविधा संस्थेला सहकार्य करेल.’

या वेळी डॉ. प्रबोध शिरवळकर, डॉ. मंजिरी भालेराव, डॉ. श्रीकांत कार्लेकर, डॉ. संजीव नलावडे, डॉ. तुषार शिरोळे, डॉ. अजित वर्तक, डॉ. उदयसिंह पेशवा या अभ्यासकांचा कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक पंडित यांनी केले. ते म्हणाले, ‘माणसाच्या प्रगतीसार प्रदर्शनाची तीन टप्प्यांत विभागणी केली आहे. प्रागैतिहासिक, ऐतिहासिक व आधुनिक. प्रागैतिहासिक काळात माणूस दगडाचा वापर प्रामुख्याने हत्यारे बनवण्यासाठी, राहण्यासाठी म्हणून गुहा व दफनभूमीत करायचा. डेक्कन कॉलेजने या प्रदर्शनात त्या काळातील माहीती मांडली आहे. ऐतिहासिक काळात किल्ले, मंदिरे, पाण्याची टाकी, शिलालेख, लेणी आदी विविध ठिकाणी दगडाचा वापर दिसतो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहाय्याने या काळाची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडली आहे.’

उद्घाटनानंतर डेक्कन कॉलेजचे डॉ. प्रबोध शिरवळकर यांचे ‘हडप्पन संस्कृतीतील दगडाचा कलात्मक वापर’ या विषयावर व्याख्यान झाले.   

आधुनिक काळातही दगडाचा वापर कमी झाला नाही. बांधकाम, घर सजावट, दागिने, खनिजे, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय, केमिकल वगैरे क्षेत्रात दगडाने मानवी जीवन व्यापले आहे, याची माहिती होणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे. प्रदर्शनात फोटो व माहितीपूर्ण पोष्टर्स, अनेक वस्तू यांचा समावेश आहे.  

प्रदर्शनाविषयी :
कालावधी :
११ ते १४ ऑक्टोबर २०१८
वेळ : सकाळी ११ ते रात्री आठ
स्थळ : राजा रविवर्मा कलादालन, महात्मा फुले संग्रहालयासमोर, घोले रोड, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search