Next
रत्नागिरी पालिकेतर्फे गुणवंतांचा सत्कार व मार्गदर्शन
BOI
Tuesday, July 31, 2018 | 05:08 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : नगरपालिकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, ते विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

हा कार्यक्रम बुधवारी (एक ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता शहरातील माळनाका येथील हॉटेल विवेकच्या सभागृहात होणार आहे. या प्रसंगी मुंबईतील शिवविद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष विजय कदम, रत्नागिरी-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष राहुल पंडित आणि उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती स्मितल पावसकर यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
बुधवार, एक ऑगस्ट २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : हॉटेल विवेक हॉल, मराठा मैदान, माळनाका, रत्नागिरी.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link