Next
राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन
BOI
Monday, September 03, 2018 | 10:52 AM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे येत्या १० डिसेंबर २०१८पासून राज्य बालनाट्य स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या राज्यातील संस्‍थांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा,’ असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक संजीव पालांडे यांनी केले आहे.

सोळाव्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १० डिसेंबरपासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर होणार आहे. बालनाट्य स्पर्धेसाठी एक हजार रुपये इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवायचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या, तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्य संस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी बालनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम शासनाच्या वेबसाइटवर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका ३० सप्टेंबरपर्यंत सादर कराव्यात.

विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेसाठी संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.

प्रवेशिका सादर करण्यासाठी पत्ते :
मुंबई, कोकण व नाशिक विभागासाठी : संचालक, सांस्कृतिक कार्य, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई- ३२ (०२२- २२०४ ३५५०).

पुणे महसूल विभागासाठी : सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक- ४, विमानतळ रोड, पुणे (०२०- २०२७ १३०१).

औरंगाबाद महसूल विभागासाठी : सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर २, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्ड टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औंरगाबाद- ४३१ ००५ (०२४०- २३३९ ०५५).

नागपूर व अमरावती महसूल विभागासाठी : सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर- ४४० ००१ (०७१२- २५५४ २११).

स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी वेबसाइट :  www.maharashtra.gov.in
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search