Next
भारतीय पारंपरिक खेळ व त्यामागील शास्त्र
BOI
Wednesday, July 03, 2019 | 10:28 AM
15 0 0
Share this article:

‘आई मला खेळायला जाऊ दे न व!’ या गाण्यातील चिमुकला जसे बाहेर खेळण्यास जाऊ द्यावे, यासाठी आईची विनवणी करीत असतो, तसे चित्र बहुतेकांच्या घरात असते. खेळातून मुलांच्या शरीराचा व मनाचा विकास होत असतो. महागडे साहित्य, गणवेश याची गरज न भासता अनेक अस्सल देशी खेळ खेळता येतात. असे खेळ व त्याचे शास्त्र असे दुहेरी महत्त्व शिरीष कुसुम प्रभाकर चव्हाण यांनी  ‘भारतीय पारंपरिक खेळ व त्यामागील शास्त्र’मधून सांगितले आहे.

यात खेळाचा प्रकार, तो कसा खेळायचा, मैदान, साहित्य व खेळाडूंची आवश्यकता, शारीरिक घटकानुसार शास्त्रीय फायदे, मुलभूत हालचालींचे कौशल्य, मानसशास्त्रीय फायदे व जीवन कौशल्ये कशी आत्मसात करता येतात, हे स्पष्ट केले आहे. अगदी लपंडाव, लंगडी, जोड साखळी, पकडापकडी, डोंगराला आग लागली...., लगोरी, डब्बा ऐसपैस, लुटूपुटीची लढाई, नाव-गाव-फळ-फूल असे मैदानावर आणि घरात खेळता येणाऱ्या ३५ खेळांचे महत्त्व यातून पटवून दिले आहे; तसेच पारंपरिक खेळाचे सामाजिक फायदेही समजावून दिले आहेत. 

पुस्तक : भारतीय पारंपरिक खेळ व त्यामागील शास्त्र
लेखक : निशा चव्हाण, शिरीष चव्हाण,
प्रकाशक : सी ईगल पब्लिकेशन 
पाने : ९९ 
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search